महाराष्ट्र

maharashtra

मासेमारी करणारी बोट समुद्रात अडकली; 17 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश - Fishing Boat Stuck In Sea

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 25, 2024, 7:59 PM IST

भाईंदरमध्ये मासेमारी करणारी बोट समुद्रात अडकली (ETV Bharat Reporter)

ठाणे Bhayandar News : भाईंदर पश्चिमेच्या उत्तन पातानबंदर येथील मासेमारी करणारी गॉडविल नावाची बोट समुद्रातून घरच्या दिशेनं निघाली असताना अचानक पंखा तुटल्यानं बोट समुद्रात अडकली. यावेळी या बोटीत एक नाखवा सह 17 खलाशी होते. कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नसल्यानं वायरलेसद्वारे मच्छिमार संस्थांच्या कार्यालयाला माहिती देण्यात आली. त्यानंतर मच्छीमार संघटनेचे बर्नड डिमोलो यांनी कोस्टगार्ड, पोलीस तसंच मत्स्य विभागाला सदर बोटीची माहिती दिली. मात्र, भर पावसात वादळात अडकलेल्या बोटीला कोणत्याही प्रकारे प्रशासनाची मदत मिळाली नाही, अशी माहिती बर्नड डिमोलो यांनी दिली. भारतीय हवामान खात्यानं पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असताना मासेमारीसाठी गेलेल्या बोटी परतीचा प्रवास करत आहेत. त्यातच समुद्रातून येणाऱ्या एका बोटीनं खवळलेल्या समुद्रात एक बोट अडकून पडल्याची माहिती मिळताच मदतीचा हात पुढं केला. यावेळी एका दोराच्या साहाय्यानं तब्बल दहा तासाच्या अथक प्रयत्नानंतर समुद्रात अडकलेली बोट उत्तन समुद्रकिनारी आणण्यात आली. हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानंतर देखील कोस्टगार्ड, पोलीस, मत्स्य विभाग अलर्ट मोडमध्ये नसल्याचं या घटनेमध्ये दिसून आलं आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details