मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी घेतलं सिद्धिविनायक, मुंबादेवीचं दर्शन - MAHAYUTI SWEARING IN CEREMONY
Published : Dec 5, 2024, 1:42 PM IST
मुंबई : देवेंद्र फडणवीस हे आज (5 डिसेंबर) महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान होणार आहेत. आज संध्याकाळी 5.30 च्या सुमारास हा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पडणार आहे. या शपथविधी सोहळ्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी मुंबईमध्ये प्रभादेवीत श्री सिद्धिविनायकाचं आणि मुंबादेवीचं दर्शन घेतलं. याप्रसंगी त्यांच्यासोबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्याचबरोबर भाजपाचे इतरही वरिष्ठ नेते होते. देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. त्यासोबतच भाजपा शासित राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण पाठवण्यात आलंय. मिळालेल्या माहितीनुसार, देशभरातील 400 संत-मुनी देखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.