महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

उंच डोंगरावरून कोसळणारा बीडचा सौताडा धबधबा ठरतोय पर्यटकांचं आकर्षण! - Sautada Waterfall

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 15, 2024, 12:45 PM IST

बीड Beed Sautada Waterfall : बीड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून दमदार पावसानं हजेरी लावलीय. त्यामुळं नदी, नाले आणि ओढे खळखळून वाहू लागलेत. त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जाणारा श्रीक्षेत्र रामेश्वर सौताडा धबधबादेखील ओसंडून वाहतोय. त्यामुळं याठिकाणी पर्यटकांची गर्दी होत असल्याचं बघायला मिळतंय. मात्र,  या परिसरात धुक्याचं प्रमाण अधिक वाढत असल्यानं पर्यटकांना या ठिकाणी जाण्यास प्रशासनानं बंदी घातलीय. तसंच हा धबधबा मनमोहक असला तरी पावसामुळं या ठिकाणी अनेक दुर्घटना होऊ शकतात. त्यामुळं अशा घटना टाळण्यासाठी या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांनी स्वतःच्या जबाबदारीवर या ठिकाणी जावं. तसंच याला पोलीस प्रशासन किंवा जिल्हा प्रशासन जबाबदार राहणार नाही, असंही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलंय.  

ABOUT THE AUTHOR

...view details