देशाची वाटचाल हुकूमशाहीकडं...; ज्येष्ठ समाजवादी नेते बाबा आढाव यांची पंतप्रधान मोदींवर टीका
Published : 5 hours ago
पुणे : राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. यानंतर राज्यात विरोधक तसंच इतर सामाजिक संघटनेच्या वतीनं ईव्हीम विरोधात लढा उभारला जात असताना, पुण्यात महात्मा फुले वाड्यात ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली तीन दिवसीय आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला अनेक राजकीय पक्षांचा पाठिंबा मिळत आहे. अशातच आज बाबा आढाव यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करत देशाची वाटचाली ही हुकूमशाहीकडं जात असल्याचं म्हटलय.
अदानीवर कारवाई झाली पाहिजे : यावेळी डॉ. बाबा आढाव म्हणाले, "आम्ही अदानी प्रकरणावर तीन दिवसीय आत्मक्लेश आंदोलन करत आहोत. आपण पाहतोय की, निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोटाळा झाला. तसंच आज देशात लोकशाहीच वस्त्रहरण करण्यात येत आहे. पुढे जाऊन सरकारच्या विरोधात सत्याग्रह देखील करणार आहोत. आमची मागणी आहे की, अदानीवर कारवाई ही झालीच पाहिजे."