महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

अटल सेतूवर पहिला अपघात! महिलेचं नियत्रण सुटल्यानं गाडी पलटी; पाहा व्हिडिओ

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 22, 2024, 7:31 AM IST

मुंबई : first accident on Atal Setu : अटल सेतू नागरिकांसाठी आठवडापूर्वी खूला करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं. त्यावर  रविवार 21 जानेवारी रोजी दुपारी अटल सेतूवर पहिला अपघात झाला. मुंबईकडं जात असताना महिला कार चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं कार पुलाच्या दुभाजकावर आदळून हा अपघात झाला. कारमध्ये एकून तिघजण होते. अपघाताची माहिती मिळताच अपघात पथकानं तातडीने मदत केली. अपघातात महिला किरकोळ जखमी आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर ओव्हरस्पीडिंग आणि चुकीच्या पद्धतीनं ओव्हरटेक केल्यामुळं हा अपघात झाला. दरम्यान, अपघातानंतर काय घडलं आहे, हे पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती. यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र, अपघातग्रस्त कार मार्गातून तत्काळ बाजूला केल्यानं काही मिनिटात वाहतूक सुरळीत करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details