महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

भारतीय सैन्य जवानांच्या शौर्य, पराक्रमानं नागपूरचा आसमंत निनादला - आर्मीच्या शस्त्रांचं प्रदर्शन

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 2, 2024, 10:50 PM IST

नागपूर Army Weapons Exhibition : सामर्थ्य आणि शौर्याचं प्रतीक असलेल्या भारतीय सैन्यदलाचा जगात दबदबा आहे. नुसतं भारतीय सैन्यदलाचं  नाव ऐकताच शत्रुला घाम फुटतो. अशा बलशाली भारतीय सैन्याला बघण्याची आणि अनुभवण्याची संधी नागपूरकरांना मिळालीय. (Indian Army) आजपासून तीन दिवस नागपूरच्या मानकापूर स्टेडियम येथे भारतीय थल सेनेच्या शस्त्रांचं प्रदर्शन सुरू झालं आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सेना प्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या उपस्थितीत शौर्य संध्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.  यावेळी भारतीय शूरवीरांनी चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केलं. स्कायडायव्हिंग, डेअरडेव्हिल्स, आर्मी डॉग शो, कलारीपयेट्टु, गटका, मालखांब आदी खेळांचं सादरीकरण करण्यात आलं.  नागरिकांनी एकचं गर्दी केली होती. लहान मुलांसाठी हे प्रदर्शन विशेष आकर्षणाचं केंद्र ठरलं.  

ABOUT THE AUTHOR

...view details