अजित पवार गटाच्या बाजुनं निकाल आल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष, पेढे वाढून आनंद साजरा - अजित पवार एनसीपी
Published : Feb 15, 2024, 9:11 PM IST
पुणे: विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निकाल दिला आहे. तसंच दोन्ही गटांचे आमदार नार्वेकरांनी पात्र ठरवले आहेत. त्यामुळं शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाकडून पुण्यात जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी पेढे वाटून तसेच फुगडी खेळून आनंद व्यक्त केला. यावेळी शहराध्यक्ष दीपक मानकर म्हणाले की, ''विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. आता समोरच्या लोकांनी लवकर पक्षाचं चिन्ह पाहावं. जे काही मिळेल ते घ्यावं. नाहीतर काहीही मिळणार नाही'', असा त्यांनी शरद पवार गटाच्या नेत्यांना टोला लगावला.