एआयएमआयएमचे नेते वारिस पठाण यांना पोलिसांनी का ताब्यात घेतलं? जाणून घ्या त्यांची प्रतिक्रिया
Published : Feb 19, 2024, 4:30 PM IST
मुंबई Waris Pathan Detained By Mumbai Police : एआयएमआयएमचे नेते वारिस पठाण सोमवारी (19 फेब्रुवारी) ) मीरा भाईंदर शहरात येणार होते. मात्र, त्यांना शहरात येऊ न देता मीरा भाईंदर शहरात अडवण्यात आलंय. तसंच वारिस पठाण यांना दहिसर चेक नाका येथून त्यांच्याच गाडीत बसवून पोलीस बंदोबस्तात दहिसर पोलीस ठाणे येथे नेण्यात आलं. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयामार्फत यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पठाण यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून ते म्हणालेत की, "मी पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यासाठी आलो आहे. मात्र, पोलीस ऐकत नाहीत. मीरा भाईंदर आणि महाराष्ट्रात वातावरण खराब होत आहे. अनेक गरिबांची दुकानं नष्ट झाली आहेत. त्यामुळंच मी निवेदन देण्यासाठी आलो आहे. मी माजी खासदार, वकील आणि एका पक्षाचा राष्ट्रीय प्रवक्ता आहे. मात्र, तरीही मला असं रोखण्यात येतंय. संविधानाची पायमल्ली करायची आहे का?", असा संतप्त सवालही यावेळी वारिस पठाण यांनी केला.