हैदराबाद Whatsapp New Feature :WhatsApp नेहमीच आपल्या वापरकर्त्यांसाठी नवीन वैशिष्ट्ये आणत असतं. आता WhatsApp नं नविन फीचर आणण्याच्या तयारीत आहे. व्हॉट्सअॅप इव्हेंट प्लॅनिंगचं नियोजन आणखी सोपं करण्यासाठी एक नवीन वैशिष्ट्य विकसित करत आहे. आता कार्यक्रमांचं वेळापत्रक तयार करण्यासाठी वेगळ्या अॅपची आवश्यकता नसणार आहे. कारण WhatsApp लवकरच तुमच्या चॅटमध्येच कार्यक्रमांचं वेळापत्रक तयार करण्याची सुविधा देणार आहे. हे वैशिष्ट्य वैयक्तिक चॅटसाठी आणलं जात आहे, पूर्वी फक्त ग्रुप चॅटपुरतं मर्यादित होतं.
कोणासाठी उपयुक्त?
हे वैशिष्ट्य मोठे व्यवस्थापक, व्यावसायिक लोकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. याद्वारे, ते कार्यक्रमाची माहिती अतिशय व्यवस्थित पद्धतीनं शेअर करू शकणार आहे. तसंच वैयक्तिक किंवा कामाशी संबंधित कार्यक्रमांचे नियोजन करणं या फीचरमुळं सोपं होणार आहे
कसे असेल वैशिष्ट्य ?
- हे वैशिष्ट्य वापरकर्त्यांना खालील सुविधा प्रदान करेल.
- कार्यक्रमाचे नाव : यात कार्यक्रमाचं नाव देणं अनिवार्य असेल.
- कार्यक्रमाचे वर्णन : जरी हा पर्याय पर्यायी असला तरी, कार्यक्रमाच्या उद्देशाबद्दल स्पष्टता द्यावी लागणार आहे.
- कार्यक्रमाची सुरवात : कार्यक्रमाची तारीख आणि वेळ अचूकपणे यात द्यावी लागणार आहे.
- स्थान सामायिकरण : कार्यक्रमाचं ठिकाण यात देता येणार आहे. ज्यामुळं सहभागींना योग्य ठिकाणी पोहोचणं सोपं होईल.
- स्वीकरा किंवा नकारा : कार्यक्रमात आमंत्रित केलेल्या लोकांना आमंत्रण स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा पर्याय असेल.
गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध
या फीचरमुळे सहभागी होणाऱ्यांना कार्यक्रमांची अधिक माहिती मिळणार आहे. त्यामुळं कोणत्याही गोंधळाशिवाय कार्यक्रम नियोजन पार पाडता येणार आहे. हे वैशिष्ट्य सध्या बीटावर चाचणी करण्यात येत आहे. केवळ काही मर्यादित वापरकर्त्यांसाठी सध्या हे फीचर उपलब्ध आहे. हे वैशिष्ट्य WABetainfo नं अँड्रॉइडच्या 2.25.1.18 आवृत्तीमध्ये आहे. त्याचं बीटा अपडेट सध्या गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. तथापि, पुढील चाचणीनंतरच हे वैशिष्ट्य सर्व वापरकर्त्यांसाठी लाँच केलं जाईल, अशी शक्यता आहे.