हैदराबाद : अलीकडंच नवीन Triumph Scrambler 400 बाईक चाचणी दरम्यान दिसलीय. ही दुचाकी Scrambler T4 आणि 400T म्हणून सादर केली जाण्याची शक्यता आहे. ही दुचाकी एक ते दोन महिन्यांत लॉंच करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
स्क्रॅम्बलर 400X :चाचणी दरम्यान समोर आलेल्या फोटोनुसार, ब्रँडचा हा नवीन Scrambler प्रकार स्वस्त करण्यासाठी अनेक गोष्टी दुचाकीत कमी करण्यात आल्याची शक्यता आहे. यात Scrambler 400X च्या तुलनेत वेगवेगळी अलॉय व्हील्स असू शकतात, जी MRF टायर्सनं सुसज्ज असतील. याशिवाय, स्क्रॅम्बलर 400X वर चमकदार रंगांऐवजी ब्लॅकआउट USD फोर्क्स असण्याचं ऑटोमोबाईल तज्ञाचं म्हणणे आहे.
काय असेल बदल : तसंच, हँडलबार, पिलियन ग्रॅब रेल आणि मागील फेंडरला काळे रंग देण्यात आला आहेत. इतर बदलांमध्ये स्प्लिट सीटच्या जागी सिंगल-पीस सीट समाविष्ट आहे. नकल गार्ड काढून टाकण्यात आला आहे आणि नवीन एलईडी टेल लाईटचा समावेश करण्यात आला आहे. बाइकच्या मूळ डिझाइनमध्ये फारसा बदल केलेली नाही. ही दुचाकी Scrambler 400X सारखी दिसते. यात 398cc, लिक्विड-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन असेल, जे 39.5bhp आणि 37.5Nm टॉर्क निर्माण करतं. बाईकला वेगळी ओळख देण्यासाठी ट्रायम्फ इंजिनमध्ये बदल करेल अशी अपेक्षा काही बाईक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
किती असेल किंमत :ट्रायम्फ स्क्रॅम्बलर जवळजवळ उत्पादनासाठी तयार दिसत आहे. ही दुचाकी लवकरच भारतात लॉंच होण्याची अपेक्षा आहे. याची किंमत Scrambler 400X पेक्षा सुमारे 25 हजार ते 30,हजार रुपयांनी कमी असेल. या दुचाकीची किंमत 2.65 लाख रुपये (एक्स-शोरूम) असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे वाचलंत का :
- iQOO 13 भारतात लॉंच, अल्ट्रा आयकेअर डिस्प्ले असलेला जगातील पहिला फोन
- OnePlus 13 जानेवारी 2025 मध्ये भारतात होणार लॉंच, एलईडी फ्लॅशसह असणार तीन कॅमेरे?
- Honda Amaze 2024 उद्या होणार लॉंच, कशी असतील वैशिष्ट्ये ?