महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

व्हॉट्सॲपवर बंदी घालण्याची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली - WHATSAPP UPDATE

WhatsApp update : व्हॉट्सॲपवर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं गुरुवारी फेटाळली. म्हणजे व्हॉट्सॲप भारतात पूर्वीप्रमाणेच आता सुरू रहाणार आहे.

WhatsApp
WhatsApp (Getty)

By ETV Bharat Tech Team

Published : Nov 16, 2024, 8:01 AM IST

हैदराबादWhatsApp update : व्हॉट्सॲप वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'व्हॉट्सॲप'वर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं 14 नोव्हेंबर रोजी फेटाळून लावलीय. म्हणजेच आता व्हॉट्सॲप भारतात पूर्वीप्रमाणेच काम करत राहणार आहे. त्यामुळं आता युजर्सना काळजी करण्याची गरज नाही. व्हॉट्सॲप केंद्र सरकारच्या आयटी मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करत नाही, असा आरोप याचिकाकर्त्यांनं याचिकेत कला होता. तसंच, व्हॉट्सॲपची गोपनीयता आणि सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. याआधी 2021 मध्ये केरळ न्यायालयानंही याच याचिकाकर्त्याची हीच मागणी फेटाळून लावली होती. केरळचे रहिवासी के.जी. ओमनाकुटन यांची याचिका केरळ उच्च न्यायालयाने 2021 मध्ये 'अपरिपक्व' म्हणून फेटाळली होती. तेव्हा सरकारनं आयटी मार्गदर्शक तत्त्वं जारी केली नसल्याचं सांगण्यात आलं होतं. माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया एथिक्स कोड) नियम, 2021 (आयटी नियम) यांना आव्हान देणाऱ्या व्हॉट्सॲपनं दिल्ली न्यायालयात धाव घेतल्यानंतर ओमानकुटन यांनी याचिका दाखल केली होती.

केरळ उच्च न्यायालयानं जून 2021 मध्ये ती जनहित अपरिपक्क असल्याचं म्हणत फेटाळली होती. याविरोधात ओमानकुट्टन यांनी केरळ उच्च न्यायालयात अपील केलं होतं. ओमानकुट्टन यांनी हा मुद्दा उपस्थित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांचे पालन न केल्यास व्हॉट्सॲपवर बंदी घालण्याचे निर्देश देण्यासाठी त्यांनी केरळ उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर 2021 मध्ये केरळ उच्च न्यायालयानं अशीच याचिका 'अपरिपक्व' म्हणून फेटाळून लावली.

त्यानंतर ही जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. हायकोर्टासमोर याचिकाकर्त्यानं म्हटले होतं की व्हॉट्सॲपनं दिल्ली उच्च न्यायालयासमोर दावा केला की ते आयटी नियम, 2021 च्या कक्षेत येत नाही. व्हॉट्सॲपच्या गोपनीयता धोरणात वापरकर्त्यांनी पाठवलेले संदेश संग्रहित केले जात नाहीत.याशिवाय, ॲपमध्ये सुरक्षिततेचा अभाव आहे, असा आरोप कंपनीवर करण्यात आला होता. IT मार्गदर्शक तत्त्वे आणि डिजिटल मीडिया एथिक्स कोड, 2021 ला आव्हान देणारी याचिका स्वतः Whatsapp नं दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे. WhatsApp नं म्हटले आहे की ते त्यांच्या गोपनीयता धोरणानुसार काम करतंय.

हे वाचलंत का :

ABOUT THE AUTHOR

...view details