हैदराबाद :नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स पंधरा दिवसांत दुसऱ्यांदा स्पेसवॉकसाठी सज्ज आहेत. ही एक्स्ट्राव्हेहिक्युलर ॲक्टिव्हिटी (EVA) आज (३० जानेवारी) सुमारे ६.५ तास चालेल. सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या (ISS) कमांडर असलेल्या विल्यम्स, फ्लाइट इंजिनिअर बूच विल्मोर यांच्यासोबत असतील. अंतराळवीर आज संध्याकाळी ६६:३० वाजता त्यांचं स्पेससूट बॅटरी पॉवरवर स्विच करणार आहेत, ज्यामुळं स्पेसवॉकची अधिकृत सुरुवात होईल. NASA+ वर लाइव्ह कव्हरेज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५:०० वाजता सुरू होईल.
सर्वात अनुभवी महिला अंतराळवीर
विल्यम्स यांचा आजचा स्पेसवॉक हा नववा स्पेसवॉक असेल. यात त्या यशस्वी झाल्या तर त्या इतिहासातील सर्वात अनुभवी महिला स्पेसवॉकर बनतील. सध्या, पेगी व्हिटसन यांच्या नावावर महिला अंतराळवीर म्हणून सर्वाधिक वेळा अंतराळात चालण्याचा विक्रम आहे, त्यांनी एकूण १० वेळा ६० तास २१ मिनिटे अंतराळात चालण्याचा विक्रम केला आहे. अलीकडील स्पेसवॉकनंतर, विल्यम्स यांच्याकडं ५६ तास ४० मिनिटे अंतराळात चालण्याचा अनुभवल आहे. आजच्या स्पेकवानंतर त्या सर्वांचे विक्रम मोडीत काढण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक (ISS) दुरुस्ती मोहिमेचा भाग म्हणून, नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आज नववा स्पेसवॉक करणार आहेत. मात्र, ISS वरील मोहिमेदरम्यान अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांना आरोग्यविषयक समस्यांकडं लक्ष देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामुळं शारीरिक ताण आणि प्रणालीत बदल होण्याची शक्यता जास्त असते.