हैदराबाद Skoda Kylaq :कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये आधीच जोरदार स्पर्धा आहे. आता Skoda India नं या क्षेत्रात नवीन Skoda Kylaq लाँच केली आहे. याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 7.89 लाख रुपये आहे. या कारची बुकिंग 2 डिसेंबरपासून भारतात सुरू होईल. नवीन Kylaq ची डिलिव्हरी 27 जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहे, याशिवाय, कॉम्पॅक्ट SUV आगामी 2025 इंडिया मोबिलिटी एक्सपोमध्ये प्रदर्शित होणार आहे. सर्व-नवीन सब-फोर मीटर एसयूव्ही अनेक बदलांसह लॉंच करण्यात आली आहे. यात 17 इंची अलॉय व्हील्स आहेत. भारतीय बाजारपेठेत ही कार कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये स्पर्धा करेल.
Skoda Kylaq वैशिष्ट्ये :किंमतीनुसार, Skoda नं Kilac कॉम्पॅक्ट SUVमध्ये भरपूर वैशिष्ट्ये प्रदान केली आहेत. यामध्ये ड्युअल डिजिटल स्क्रीन, पॉवर्ड ड्रायव्हर सीट, लेदरेट अपहोल्स्ट्री, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, ॲम्बियंट लाइटिंग आणि 6-स्पीकर साउंड सिस्टम यांचा समावेश आहे. याशिवाय, सुरक्षिततेच्या दृष्टीनं ही एक मजबूत कार आहे, यात 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, ट्रॅक्शन कंट्रोल प्रोग्राम, ISOFIX चाइल्ड सीट माउंट, हेडरेस्ट आणि सर्व प्रवाशांसाठी तीन-पॉइंट सीट बेल्ट देण्यात आला आहे. त्याची लांबी 3.95 मीटर, व्हीलबेस 2.56 मीटर, 189 मिमी ग्राउंड क्लीयरन्स आणि 44 लीटर बूट स्पेस आहे.