महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

सेट टॉप बॉक्सशिवाय पाहता येणार टीव्ही चॅनेल, सॅमसंगन आणलं TVKey क्लाउड तंत्रज्ञान - TVKEY CLOUD TECHNOLOGY

आता थेट टीव्ही चॅनेल पाहण्यासाठी तुम्हाला सेट टॉप बॉक्स बसवण्याची गरज नाही. सॅमसंगनं एक नविन तंत्रज्ञान आणलं असून सेट-टॉप बॉक्सशिवाय टीव्ही चॅनेल पाहता येणार आहे.

TVKey Cloud Technology
TVKey Cloud Technology (Samsung)

By ETV Bharat Tech Team

Published : Dec 6, 2024, 8:00 AM IST

हैदराबाद :सॅमसंगनं नविन तंत्रज्ञान आणलं आहे. आता टीव्ही चॅनेल पाहण्यासाठी सेट टॉप बॉक्स बसवण्याची गरज नसनार आहे. तुम्ही आता सेट-टॉप बॉक्सशिवाय थेट टीव्ही चॅनेल पाहू शकता. सॅमसंगनं भारतात आपल्या टीव्हीसाठी TVKey क्लाउड तंत्रज्ञान लाँच केलं आहे. या तंत्रज्ञानामुळं वापरकर्त्यांना सेट-टॉप बॉक्सशिवाय थेट टीव्ही चॅनेल पहाता येतं. हे नवीन वैशिष्ट्य GTPL हॅथवे आणि डिश टीव्ही ऑपरेटर्सवरील विद्यमान सॅमसंग टीव्हीसह काम करतंय.

काय आहे Samsung TVKey क्लाउड तंत्रज्ञान? :TVKey क्लाउड तंत्रज्ञान Samsung आणि NAGRAVISION यांनी संयुक्तपणं विकसित केलं आहे. यामुळं सेट-टॉप बॉक्सची गरज नाहीय. टीव्हीला वाय-फाय द्वारे इंटरनेट कनेक्शन आणि केबल टीव्ही किंवा डीटीएच अँटेना वायरशी थेट कनेक्शट असणं आवश्यक आहे. सॅमसंग टीव्ही त्याच्या अंगभूत प्रोसेसरचा वापर केबल/डीटीएचवर मिळालेलं सिग्नल ओळखण्यासाठी करतं. सॅमसंग स्मार्ट टीव्ही रिमोट वापरून वापरकर्ते त्यांचं आवडतं टीव्ही चॅनेल पाहू शकता.

टीव्ही पॅक खरेदी करणं आवश्यक :TVKey क्लाउड तंत्रज्ञानानं सेट-टॉप बॉक्सची जागा घेतली, तरीही वापरकर्त्यांना त्यांच्या केबल/डीटीएच ऑपरेटरकडून सक्रिय टीव्ही पॅक खरेदी करणं आवश्यक आहे. सध्या, हे वैशिष्ट्य GTPL Hathway Cable आणि Dish TV DTH ऑपरेटर्सकडं उपलब्ध आहे. भारतातील एअरटेल, व्हिडिओकॉन किंवा इतर केबल/डीटीएच सेवा प्रदात्यांवर हे वैशिष्ट्य कधी उपलब्ध होईल, याबद्दल सॅमसंगनं अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. TVKey विद्यमान सॅमसंग टीव्ही मॉडेल्सशी सुसंगत आहे, ज्यामध्ये अल्ट्रा HD, OLED, QLED आणि निओ QLED कनेक्टेड प्रकारांचा समावेश आहे. यात ओटीटी ॲप्स स्ट्रीमिंगचं देखील ऑप्शन आहे. वापरकर्ते रिमोटचा वापर करून थेट टीव्ही चॅनेल आणि OTT सामग्री सहजपणे स्विच करू शकतात.

Samsung TVKey Cloud साठी GTPL ऑफर : GTPL सॅमसंग TVKey क्लाउड वापरकर्त्यांसाठी मासिक पेमेंटसह एक महिन्याची विनामूल्य सदस्यता ऑफर देत आहे. अतिरिक्त फायद्यांमध्ये सक्रिय सदस्यता कालावधी दरम्यान GTPL Buzz (लाइव्ह टीव्ही मोबाइल ॲप) मध्ये विनामूल्य प्रवेश मिळेल. ब्लॅकनट क्लाउड गेमिंग सेवेसाठी 15-दिवसांची विनामूल्य सेवा मिळेल. तुमचा सॅमसंग टीव्ही नवीन तंत्रज्ञानाशी सुसंगत असल्यास, तुम्ही GTPL कडून मोफत इंस्टॉलेशनसह मोफत वाय-फाय राउटर देखील मिळवू शकता. सेवा प्रदाता 6 महिन्यांच्या प्लॅनवर 1 महिन्याची मोफत सेवा आणि 12 महिन्यांच्या इंटरनेट सबस्क्रिप्शन प्लॅनवर 2 महिन्यांची मोफत सेवा देत आहे.

हे वाचलंत का :

  1. iQOO 13 प्री-बुकिंग सुरू, 3 हजारांच्या विशेष सवलतीसह मिळताय मोफत इयरबड्स
  2. 50 मेगापिक्सलच्या मुख्य कॅमेऱ्यासह Moto G35 5G होणार लॉंच
  3. POCO M7 Pro 5G आणि POCO C75 5G लवकरच लाँच होणार, काय असेल खास?

ABOUT THE AUTHOR

...view details