हैदराबाद : Samsung Galaxy S24 Ultra & Galaxy S24 Enterprise Edition : या वर्षाच्या सुरुवातीला, Samsung नं आपला एंटरप्राइझ-एक्सक्लुझिव्ह Samsung XCover7 स्मार्टफोन देशात लॉंच केला. आता यानंतर सॅमसंगनं आपल्या फ्लॅगशिप Galaxy S24 आणि Galaxy S24 Ultra स्मार्टफोनचे एंटरप्राइज एडिशन भारतात लॉंच केले आहे. फोनमध्ये सामान्य Galaxy S24 आणि Galaxy S24 Ultra मॉडेल प्रमाणेच वैशिष्ट्ये आहेत. दोन्ही नवीन फोनमध्ये Galaxy AI वैशिष्ट्ये आहेत, ज्यामध्ये तुम्हाला Live Translate, Circle to Search with Google, Note Assist आणि Interpreter सारखी वैशिष्ट्ये मिळतील.
Samsung Galaxy S24 Ultra आणि Galaxy S24 Enterprise Edition ची किंमत :Samsung Galaxy S24 8GB + 256GB आणि Galaxy S24 Ultra 12GB + 256GB एंटरप्राइज एडिशन मॉडेल्सची किंमत 96 हजार 749 रुपयांपर्यंत आहे. तुम्ही Samsung.com वर Samsung Corporate+ पोर्टलला भेट देऊन हे दोन्ही फोन खरेदी करू शकता. फोनवर बँक सवलत आणि एक्सचेंज बोनस देखील उपलब्ध आहेत.
Samsung Galaxy S24 Ultra आणि Galaxy S24 Enterprise Edition ची वैशिष्ट्ये :Samsung Galaxy S24 Ultra Enterprise Edition मध्ये 12GB RAM आणि 256GB स्टोरेज आहे, तर एंटरप्राइज एडिशन Galaxy S24 मध्ये 8GB RAM आणि 256GB स्टोरेज आहे. नवीन गॅलेक्सी एंटरप्राइझ एडिशन स्मार्टफोन्स नॉक्स सूटच्या 12 महिन्यांच्या सबस्क्रिप्शनसह येतात. Samsung Galaxy S24 5G मध्ये चांगल्या कामगिरीसाठी Exynos 2400 प्रोसेसर आहे. Samsung Galaxy S24 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. Galaxy S24 मध्ये 50MP पहिला सेन्सर, 10MP दुसरा आणि 12MP तिसरा लेन्स आहे.