हैदराबाद Samsung Galaxy A06 Launched :सॅमसंगनं आपला नवीन स्मार्टफोन भारतीय मोबाइल बाजारात लॉन्च केला आहे. Samsung Galaxy A06 असं या फोनचं नाव आहे. सॅमसंगच्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे. या हँडसेटमध्ये अनेक चांगले फिचर, 50MP कॅमेरा तसंच 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
हँडसेटची किंमत 9,999 पासून सुरू :Samsung Galaxy A06 च्या किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, हा हँडसेटची किंमत 9,999 पासून सुरू होतेय. ज्यामध्ये 4GB + 64GB स्टोरेज उपलब्ध आहे. याशिवाय, 4GB + 128GB व्हेरिएंट 11,499 रुपयांना उपलब्ध असेल. सॅमसंग ए सीरीजचा हा हँडसेट सॅमसंग इंडिया ई-स्टोअरवर उपलब्ध आहे. येत्या काही दिवसांत, ते लवकरच मोठ्या ई-कॉमर्स वेबसाइट तसंच ऑफलाइन स्टोअर्सवर उपलब्ध करून दिला जाईल.
Samsung Galaxy A06 : Samsung Galaxy A06 मध्ये 6.7-इंचाचा IPS LCD पॅनेल आहे. जो HD+ रिझोल्यूशनसह येतो. यामध्ये यूजर्सना 60Hz चा रिफ्रेश रेट मिळतो. या सॅमसंग हँडसेटमध्ये MediaTek Helio G85 चिपसेट आणि Mali-G52 MP2 GPU वापरण्यात आला आहे. यासह, 4GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेजचे देण्यात आलं आहे. यामध्ये 1TB पर्यंतचं मायक्रोएसडी कार्ड टाकता येतं.