हैदराबाद IRCTC Changes Reservation Rules :जर तुम्ही भारतीय रेल्वेचं आयआरसीटीसी ॲप किंवा वेबसाइटवरून रेल्वेचं तिकीट ऑनलाईन बुक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण भारतीय रेल्वेन आगाऊ रेल्वे तिकीट बुकिंगचे नियमात बदल केला आहे. त्यामुळं प्रवासी आता फक्त 60 दिवस आधी रेल्वे तिकीट बुक करू शकतात. यापूर्वी भारतीय रेल्वेनं 120 दिवस अगोदर रेल्वे तिकीट बुकिंगची सुविधा दिली होती. आता ती 60 दिवसांवर आणली आहे. हे नियम काय आहेत?, कधी पासून लागू होणार आहे?, जाणून घेऊया...
1 नोव्हेंबर 2024 पासून नियम लागू :भारतीय रेल्वेचे टिकीट बुकिंगचे नवे नियम 1 नोव्हेंबर 2024 पासून लागू होणार आहे. आगाऊ ट्रेन तिकीट बुकिंगसाठी हा नवीन नियम लागू होईल. आधीच बुक केलेल्या तिकिटांवर याचा परिणाम होणार नाही. तुम्ही आगाऊ रेल्वं तिकीट बुक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला नवीन नियम माहित असणं आवश्यक आहे, अन्यथा, तुम्हाला कन्फर्म ट्रेन तिकीट मिळण्यात अडचण येऊ शकते.
AI प्रणालीचा वापर : प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी भारतीय रेल्वे झपाट्यानं हायटेक होत आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, भारतीय रेल्वे गाड्यांमध्ये एआय AI प्रणाली बसवण्यात येत आहे. ज्यामुळं सीट उपलब्धता, ट्रेनमधील तिकीट रद्द करण्याच्या प्रक्रियेत सुधाणा होईल. आयआरसीटीसी ॲप एआयच्या मदतीनं सीट उपलब्धतेच्या टक्केवारीची माहिती प्रवाशांना मिळणार आहे.