महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

Rorr EZ इलेक्ट्रिक बाइकच्या लॉंचची तारीख जाहीर, उत्तम राइडिंगचा देणार अनुभव

देशातील इलेक्ट्रिक टूव्हीलर उत्पादक ओबेन इलेक्ट्रिक आपली नवीन इलेक्ट्रिक बाइक Rorr EZ लाँच करणार आहे. या दुचाकीचा टीझर रिलीज झाला आहे.

Rorr EV electric bike
Rorr EZ इलेक्ट्रिक बाइक (Oben Electric)

By ETV Bharat Tech Team

Published : 4 hours ago

हैदराबाद : भारतात ओबेन इलेक्ट्रिक, आघाडीची इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी आहे. आता कंपनीनं त्यांच्या बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक दुचाकी ओबेन रॉर ईझेडचा नवीनतम टीझर प्रसिद्ध केला आहे. या टीझरमध्ये कंपनीनं 7 नोव्हेंबर 2024 रोजी इलेक्ट्रिक मोटरसायकल लॉंच करण्याबाबत माहिती दिली आहे.

Rorr EZ कम्युटर सेगमेंटमध्ये लॉंच होणार :कंपनी ही बाइक डेली कम्युटर सेगमेंटमध्ये लॉंच करणार आहे. ही इलेक्ट्रिक बाइक सध्याच्या परिस्थितीला आव्हान देणार आहे. असा दावा कंपनीनं केला आहे. सध्या, इलेक्ट्रिक बाईकबद्दल माहिती समोर आलेली नाही, परंतु ओबेन रॉर ईझेड चांगल्या फिचर सुविधा, डिझाइन, कार्यप्रदर्शनासह लॉंच होऊ शकते. Rorr EZ सह, ओबेन इलेक्ट्रिकचे उद्दिष्ट दैनंदिन प्रवासाचा अनुभव वाढवणे आणि इलेक्ट्रिक कम्युटिंगचं येणाऱ्या काळात उदात्तीकरण करणं आहे.

LFP बॅटरी तंत्रज्ञानाचा वापर :Rorr EZ अत्याधुनिक दुचाकी पेटंट केलेल्या उच्च-कार्यक्षमता LFP बॅटरी तंत्रज्ञानाचा वापर करते, जे भारतातील वैविध्यपूर्ण हवामानातील अपवादात्मक उष्णता प्रतिरोधकता, दीर्घ आयुष्य आणि विश्वासार्हतेसाठी ओळखली जाते. ओबेन इलेक्ट्रिकनं इलेक्ट्रिक टू-व्हीलरमध्ये LFP केमिस्ट्री बॅटरीचा पायनियर बनवला आहे, ज्यामुळं बाईक सर्वोच्च सुरक्षासह चांगलं कार्यप्रदर्शन करतेय.

उत्तम राइडिंगचा अनुभव :ओबेन इलेक्ट्रिकच्या यशाची गुरुकिल्ली संशोधन आणि विकासासाठीची तिची अटूट बांधिलकी आहे. R&D पासून बॅटरी, मोटर्स, वाहन नियंत्रण युनिट्स आणि जलद चार्जर यांसारख्या महत्त्वपूर्ण घटकांच्या निर्मितीपर्यंत कंपनी इन-हाउस तयार करते. गाड्यांची अचूकता, गुणवत्ता आणि बाजारातील बदलांना कंपनी प्राधान्य देते,असा कंपनीचा दावा आहे. कंपनीनं असंही म्हटलं आहे की ओबेन केअरद्वारे प्रदान केलेल्या सर्वसमावेशक विक्रीनंतरच्या समर्थनासह, Rorr EZ केवळ उत्तम राइडिंग अनुभवच देत नाही, तर चांगला प्रवास देखील देते.

हे वाचलंत का :

  1. इराणनं आयफोनवरील बंदी उठवली, iPhone खरेदीचा मार्ग मोकळा
  2. ॲपल भारतात 4 नवीन स्टोअर्स उघडणार, भारतात केला कमाईचा विक्रम
  3. Honor Magic 7 आणि Honor Magic 7 Pro लॉंच, 200MP टेलिफोटो कॅमेरा

ABOUT THE AUTHOR

...view details