ETV Bharat / state

राज ठाकरेंचा 'विश्वजित' संजय राऊत बंधूंचा गड भेदण्याच्या तयारीत; विक्रोळीत कोणाचा होणार विजय?

विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील मनसेच्या मतांचा विचार केला असता इथे साधारण 30 हजार मनसेचे ठरलेले मतदार आहेत.

Sunil Raut and Vishwajit Dholam
सुनील राऊत आणि विश्वजित ढोलम (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 1, 2024, 7:08 PM IST

Updated : Nov 3, 2024, 12:39 PM IST

मुंबई -: सध्या सर्वत्र निवडणुकीच्या चर्चा सुरू आहेत. त्यातही मुंबईतील वरळी आणि माहीम विधानसभा मतदारसंघात काय होतं? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मुंबईत असाच एक मतदारसंघ आहे, जिथे शिवसेना ठाकरे गटाची प्रतिष्ठा पणाला लागलीय. खरं तर तो विधानसभा मतदारसंघ म्हणजे विक्रोळी आहे. शिवसेना ठाकरे गटाची फायर ब्रँड तोफ असलेल्या संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सुनील राऊत मागील दोन टर्म या विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. आता त्यांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उमेदवार दिला असून, मनसेचे विश्वजित ढोलम निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

30 हजार मनसेचे ठरलेले मतदार: विक्रोळी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा गड मानला जातो. या मतदारसंघाचा इतिहास पहिला असता येथे शिवसेनेचे लीलाधर डाके तीन टर्म आमदार होते. त्यानंतर संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत मागील दोन टर्म इथे आमदार आहेत. इथे शिवसेनेची ताकद असली तरी 2009 पासून इथे मनसेचादेखील एक ठरावीक असा मतदार आहे. या विधानसभा मतदारसंघातील मनसेच्या मतांचा विचार केला असता इथे साधारण 30 हजार मनसेचे ठरलेले मतदार आहेत. आता शिवसेनेत दोन गट पडल्याने शिवसेनेच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे मनसेला ही एक संधी वाटत असली तरी मनसेसमोर देखील काही आव्हान आहेत. ही आव्हान मनसेचे उमेदवार विश्वजित ढोलम कसे पार करतात हे निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.

ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीनं विश्वजित ढोलम यांच्याशी संवाद साधला (Source - ETV Bharat Reporter)

विक्रोळीत आरोग्य सुविधाच नाही- ढोलम: या संदर्भात विश्वजित ढोलम यांनी 'ईटीव्ही भारत'ला विशेष मुलाखत दिलीय. या मुलाखतीत बोलताना ढोलम म्हणाले की, "विक्रोळीतील जनतेचे प्रश्न मागील वर्षानुवर्ष सुटलेले नाहीत. इथे आरोग्य सुविधाच नाही. विक्रोळीत पालिकेचे ज्योतिबा फुले हॉस्पिटल आहे. मात्र, ते सुस्थितीत नाही. विक्रोळीत एखादा माणूस गंभीर आजारी पडला तर त्याला उपनगरातून मुंबईत यावं लागतं. अशातच आता नव्याने येऊ घातलेला धारावी पुनर्विकास प्रकल्पातील धारावीकरांचे पुनर्वसन आमच्या मुलुंड आणि विक्रोळी भागात केले जाणार आहे, ज्याला आमचा विक्रोळीवासीयांचा विरोध आहे. महाराष्ट्र निर्माण सेना याबाबतीत विक्रोळीतील जनतेच्या मागे असून, आम्ही इथे पुनर्विकासाचे कॅम्प लावू देणार नाही," अशी भूमिका विश्वजित ढोलम यांनी मांडली आहे.

पाच वर्षांसाठीचे मनसेचे व्हिजन काय ?: विक्रोळी विधानसभा मतदारसंघासाठी मनसेचे पुढील पाच वर्षांसाठीचे व्हिजन काय असेल? असा प्रश्न आम्ही विश्वजित यांना विचारला असता त्यांनी सांगितलं की, सध्याचे आमदार हे सुलभ शौचालय, पेवर ब्लॉक यांची उद्घाटन अन् नारळ फोडत आहेत. खरं तर हे एका आमदाराचे काम नाही. मनसेचे व्हिजन हे विकासाचे आहे. मुंबईच्या एन्ट्री पॉइंटचा टोलनाका याच व्रिकोळी मतदारसंघाच्या वेशीवर आहे. खरं तर हा टोल नाका बंद व्हावा, यासाठी आम्ही महाराष्ट्र सैनिकांनी आंदोलन केली. माझ्यासह माझ्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल होते. मात्र, आम्ही आंदोलन केली, त्यामुळेच आता हा टोलनाका बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. हा टोलनाका बंद झाल्यावर मुंबईच्या एन्ट्री पॉइंटवर लोकांना मुंबईचा इतिहास, मुंबईची संस्कृती दिसावी, यासाठी आपण आकर्षक म्युझियम उभारणार असल्याचं ढोलम यांनी सांगितलं.

मराठी बांधवांचं विस्थापन थांबवणे मनसेसमोरचं आव्हान: विक्रोळीत अनेक कामगार राहतात. मुंबईतील परळ, लालबाग या भागात राहणारे काही कामगार जेव्हा विस्थापित झालेत ते उपनगरात स्थिरावलेत. मात्र, या भागात जशा टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत, तसेच त्या विक्रोळीतदेखील उभ्या राहत आहेत. त्यामुळे इथला मराठी माणूस पुन्हा एकदा विस्थापित होण्याची शक्यता वर्तवली जातेय. महाराष्ट्र निर्माण सेना कायमच मराठी विषयावर लढत राहिली. असं असलं तरी विक्रोळी विधानसभा मतदारसंघातील मराठी बांधवांचं विस्थापन थांबवणे हे मनसेसमोरचं मोठं आव्हान आहे. या लोकांचे स्थलांतर मनसे कसे थांबवणार? असा प्रश्न आम्ही विश्वजित त्यांना विचारला असता त्यांनी सांगितले की, विकास, प्रगती ही कोणत्याही मतदारसंघात व्हायलाच हवी. ते विक्रोळीदेखील होईल. यात मराठी माणूस विस्थापित होऊ नये, यासाठी मनसे इथल्या रहिवाशांच्या मागे ठाम उभे राहील, अशी प्रतिक्रिया विश्वजित यांनी दिलीय.

हेही वाचा

  1. अमित ठाकरेंचा दारोदारी जाऊन प्रचार सुरू, पण सदा सरवणकरही निवडणूक लढवण्यावर ठाम
  2. जरांगे पाटील 'येडा' माणूस; ओबीसी 'या' उमेदवारांना मतदान करणार नाही, लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं

Last Updated : Nov 3, 2024, 12:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.