हैदराबाद : भारतात ॲपलनं नवा विक्रम केला आहे. कंपनीनं सप्टेंबरमध्ये हा विक्रम केला आहे. अशा परिस्थितीत ॲपल आता भारताकडं पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहत आहे. यामुळंच कंपनी भारतात नवीन रिटेल स्टोअर्स उघडण्याचा विचार करत आहे. खुद्द ॲपलचे सीईओ टिम कुक यांनी ही माहिती दिली आहे. Apple ने जुलै ते सप्टेंबर पर्यंत 94.9 अब्ज डॉलरची कमाई केली आहे. त्यांचा व्यावसाय मागिल वर्षिच्या तुलनेत सुमारे 6 टक्क्यानं वाढला आहे. भारतातील महसूलात झालेली वाढ पाहून टीम कुकनं 4 नवीन स्टोअर भारतात उघडण्याची योजना आखली आहे.
आयफोनबद्दल बोलायचं झालं तर फोन प्रत्येक परिस्थितीत चांगली कामगिरी करत आहे. सप्टेंबर तिमाहीचा महसूल खूप वाढला आहे. महसुलाबद्दल बोलायचं तर तो 12 टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. गुरुवारी भारताचा उल्लेख करताना टीम कुक म्हणाले, 'भारतातील लोकांचा उत्साह पाहून आम्हाला आश्चर्य वाटत आहे. यामुळंच आम्ही महसूलात विक्रम केला आहे. ॲपलसाठी हे खूप खास आहे.'
भारतात 4 नवीन स्टोअर्स उघडणार : सध्या ॲपलचे भारतात फक्त 2 स्टोअर्स आहेत. एक स्टोअर नवी दिल्ली (साकेत) येथे आहे आणि दुसरं मुंबईमध्ये (बीकेसी) येथे आहे. टीम कुक म्हणतात, 'आम्ही भारतात 4 नवीन स्टोअर्स उघडण्याची आशा करत आहोत. आम्हाला शैक्षणिक क्षेत्रात काम करायचं आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीनं आम्हाला हे करणं खूप सोपं होईल. शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना हे समजावून सांगावं आणि गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करावा अशी आमची इच्छा आहे.'ॲपल भारतात उत्पादनावरही भर देत आहे. मोबाईल उत्पादन व्यवसायानंही 50 हजार कोटींचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळंच चीनची चिंता खूप वाढली असून ॲपललाही याचा थेट फायदा होत आहे.
हे वाचलंत का :