हैदराबाद : मोटोरोला G35 5G स्मार्टफोनचा सेल आजपासून सुरु झाला आहे. ग्राहक हा फोन विशेष सवलतीत खरेदी करू शकतात. या 5G फोनची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे. मोटोरोलानं गेल्या आठवड्यात बजेट सेगमेंटमध्ये आपला 5G स्मार्टफोन मोटोरोला G35 5G लाँच केला होता. हा फोन आज विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन आज, 16 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजल्यानंतर ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून 10,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत ऑर्डर करता येईल.
काय आहे खास :मोटोरोला G35 5G मध्ये सुरळीत कामगिरीसाठी Unisoc T760 प्रोसेसर आहे. 4GB रॅम व्यतिरिक्त, त्याला IP52 रेटिंग मिळालयं. या फोनमध्ये विशेष व्हिजन बूस्टर आणि नाईट व्हिजन मोड सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत. तसंच, दीर्घ बॅकअपसाठी, यामध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे.
Moto G35 5G ची किंमत :मोटोरोलाच्या नवीन बजेट स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे. कंपनीच्या वेबसाइटव्यतिरिक्त, तो ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून ऑर्डर करता येईल, जिथं ग्राहकांना विशेष ऑफर्सचा लाभ घेता येईल. हा स्मार्टफोन पेरू रेड, लीफ ग्रीन आणि मिडनाईट ब्लॅक कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.