महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

Mercedes Benz EQS SUV 16 सप्टेंबर रोजी भारतात लॉन्च होणार, एका चार्जवर 643 किमी पर्यंतची रेंज - Mercedes Benz EQS SUV - MERCEDES BENZ EQS SUV

Mercedes Benz EQS SUV : 16 सप्टेंबर रोजी भारतात Mercedes-Benz EQS SUV लॉन्च होणार आहे. मर्सिडीजची ही भारतातील सहावी इलेक्ट्रिक कार असणार आहे. यात 118 kWh क्षमतेचा लिथियम-आयन बॅटरी पॅक असेल. या कारचा टॉप-स्पीड 210kph आहे. या कारमध्ये कोणते फिचर मिळणार आहेत?, जाणून घेऊया.

Mercedes Benz EQS SUV :
मर्सिडीज (Mercedes)

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 14, 2024, 4:53 PM IST

हैदराबाद Mercedes-Benz EQS SUV :मर्सिडीज-बेंझ EQS SUV भारतात लॉन्च करण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनीनं मर्सिडीज-बेंझ EQS SUV लॉन्च तारीख जाहीर केली आहे, 16 सप्टेंबरला भारतात मर्सिडीज-बेंझ लॉंच होणार आहे. EQS लिमोझिन, EQE SUV, EQA, EQB आणि Maybach EQS SUV नंतर मानक EQS ही जर्मन ऑटोमेकरची भारतातील सहावी इलेक्ट्रिक कार असणार आहे. Mercedes-Benz च्या नवीन e-SUV च्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊया.

मर्सिडीज-बेंझ EQS फिचर : कारच्या बाहेरून यात शार्प एलईडी हेडलॅम्प, ब्लॅक-आउट ब्लॅक पॅनल ग्रिल आणि समोरील बाजूस क्षैतिज एलईडी लाइट स्ट्रिप देण्यात आली आहे. सोबतच अलॉय व्हील, एलईडी लाइट बारसह एलईडी टेललाइट्स, ट्वीक केलेलं बंपर मिळणार आहे.

को-ड्रायव्हर डिस्प्ले : कारच्या अंतर्गत तुम्हाला MBUX हायपरस्क्रीन नावाचा एक मोठा सिंगल-पीस पॅनेल असेल, जो इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, सेंटर टचस्क्रीन आणि को-ड्रायव्हर डिस्प्लेला जोडलेला आहे. त्यात ऑगमेंटेड रिॲलिटी नेव्हिगेशनसह पर्यायी हेड-अप डिस्प्ले देखील दिसू शकतो.

अलॉय व्हील डिझाइन :लूकच्या बाबतीत, EQS SUV ची बहुतेक रचना नुकत्याच लाँच झालेल्या Maybach सारखीच असेल, फक्त काही घटक बदलले असतील. स्टँडर्ड EQS मध्ये एक वेगळी मेबॅच ग्रिल असेल, ज्यामध्ये उभ्या-स्लॅट डिझाइनची कमतरता असेल, तसंच बाह्य भागावरील मेबॅक लोगोचा बराचसा भाग काढून टाकला जाईल. बंपरमध्ये स्टाइलिंग बदल देखील असतील. EQS SUV ला विविध अलॉय व्हील डिझाइन देखील मिळतील. EQS SUV जागतिक बाजारपेठेत तीन पॉवरट्रेन पर्यायांसह ऑफर केली जातेय. ज्यात रियर-व्हील ड्राइव्ह 450+, ऑल-व्हील ड्राइव्ह 450 4मॅटिक आणि ऑल-व्हील-ड्राइव्ह 580 4मॅटिक यांचा समावेश आहे. तीनपैकी, EQS SUV चा सर्वात महाग 580 4Matic प्रकार भारतात लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये 400kW आणि 858 Nm पीक टॉर्कसाठी ड्युअल मोटर पॉवरट्रेन असण्याची शक्यता आहे.

हे वाचलंत :

  1. होंडा सिटी स्पेशल एडिशनची घोषणा, स्पेशल एडिशन V ट्रिमवर आधारित - Honda City special edition
  2. नवीन Kia कार्निवल बुकींग सुरू, 'या' तारखेला होणार कार्निवल लॉंच - New Kia Carnival booking starts
  3. फोर्ड पुन्हा सुरू करणार भारतात उत्पादन, 3 वर्षांपूर्वी केला होता देशात व्यावसाय बंद - Ford Motor

ABOUT THE AUTHOR

...view details