हैदराबाद Mercedes AMG C63 S E Performance :लक्झरी कार उत्पादक मर्सिडीज-बेंझनं भारतीय बाजारपेठेत आपली नवीन मर्सिडीज AMG C63 S E परफॉर्मन्स कार लॉन्च केलीय. कंपनीनं ही कार 1.95 कोटी रुपये (एक्स-शोरूम) किंमतीत बाजारपेठेत आणली आहे. या परफॉर्मन्स कारमध्ये कंपनीच्या परिचित सी-क्लास सेडानची झलक आहे. कंपनीनं लॉंचसह या परफॉर्मन्स सेडानची बुकिंग देखील सुरू केली आहे, मात्र कारची डिलिव्हरी 2025 च्या दुसऱ्या तिमाहीपासून सुरू होईल.
मर्सिडीज AMG C 63 S E Performance साइड प्रोफाइल (Mercedes) मर्सिडीज AMG C63 S E :नवीन मर्सिडीज एएमजी सी 63 एस ई परफॉर्मन्सचा आकार कंपनीच्या सी-क्लास सेडानसारखाच ठेवण्यात आला आहे. कारचा पुढचा भाग लांब असून त्यात रुंद फेंडर्स आहेत. त्याच्या पुढच्या भागात एलईडी डीआरएलसह एलईडी हेडलाइट्स आहेत, जे सी-क्लास सेडानमधून घेतले आहेत. AMG मॉडेल्सप्रमाणे, कंपनीने या सेडानमध्येही नेहमीच्या मर्सिडीज स्टारच्या जागी काळा AMG बॅज दिला आहे. कारमध्ये उभ्या स्लॅटसह AMG-विशिष्ट लोखंडी जाळी आणि अधिक आक्रमक दिसणारा फ्रंट बंपर आहे.
19-इंच AMG अलॉय व्हील :याशिवाय, ग्रिलच्या मागे आणि बंपरमध्ये दोन इलेक्ट्रिकली नियंत्रित एअर इनटेक दिले आहेत, जे आवश्यकतेनुसार हवेचा प्रवाह सुरळीत करतात. AMG C 63 S E परफॉर्मन्सच्या साइड प्रोफाईलबद्दल बोलायचं झाल्यास, यात स्पोर्टी साइड स्कर्ट आणि 19-इंच AMG अलॉय व्हील मानक आहेत. कारच्या मागील बाजूस एक काळा डिफ्यूझर, दोन्ही बाजूला दोन ट्रॅपेझॉइडल एक्झॉस्ट टिप्स आणि बूटच्या झाकणावर एक काळा स्पॉयलर आहे. टेललाइट नियमित सी-क्लास प्रमाणेच यात मिळणार आहेत. याशिवाय, मागील डाव्या फेंडरवर प्लग-इन चार्जिंग फ्लॅप आणि लाल हायलाइट्स असलेला मॉडेल बॅज आहे. ज्यामुळे कार मानक C-क्लास मॉडेलपेक्षा वेगळी आहे.
मर्सिडीज AMG C63 S E वैशिष्ट्ये :AMG C 63 S E परफॉर्मन्सच्या आतील भागाबद्दल बोलताना, कंपनीनं AMG स्पोर्ट्स सीटसाठी विविध अपहोल्स्ट्री पर्याय दिले आहेत. ज्यामध्ये समोरच्या हेडरेस्टवर एम्बॉस्ड AMG लोगोसह नप्पा लेदरचा समावेश आहे. मर्सिडीज याला पर्यायी ऍक्सेसरी म्हणून AMG परफॉर्मन्स सीट देखील देते. यात ड्राईव्ह मोड तसंच सस्पेंशन सेटिंग्ज निवडण्यासाठी रोटरी डायलसह AMG स्टीयरिंग व्हील देखील मिळतंय. यात नियमित C-क्लास प्रमाणेच 11.9-इंचाची MBUX टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम मिळते. याव्यतिरिक्त, 12.3-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, पर्यायी हेड-अप डिस्प्ले, रेस आणि सुपरस्पोर्ट यात ग्राहकांना मिळणार आहे. पॅनोरामिक सनरूफ आणि बर्मेस्टर ऑडिओ सिस्टम इतर वैशिष्ट्ये यात उपलब्ध आहेत.
मर्सिडीज AMG C63 S E परफॉर्मन्स पॉवरट्रेन : नवीन मर्सिडीज AMG C 63 S E परफॉर्मन्सच्या इंजिनबद्दल बोलायचं झाल्यास, आयकॉनिक 4-लिटर V8 इंजिनच्या जागी, फॉर्म्युला 1 मधून घेतलेलं 2-लिटर, 4-सिलेंडर, ट्विन-टर्बो पेट्रोल इंजिन बसवलं आहे. हे इंजिन 468 bhp चा पॉवर देतं. याशिवाय कारच्या मागील एक्सलवर टू-स्पीड इलेक्ट्रिक मोटर देखील बसवण्यात आली आहे. हा हायब्रिड सेटअप एकूण 671 bhp पॉवर आणि 1,020 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क प्रदान करतं. त्यातील इलेक्ट्रिक मोटर 6.1 kWh बॅटरी पॅकमधून उर्जा घेतं, जी पूर्ण चार्ज झाल्यावर 13 किमी पर्यंत वीज पुरवतं. यात इंजिनसह 9-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स वापरण्यात आले आहे.ज्यामुळं कारच्या सर्व चाकांना पॉवर मिळते. ही कार 3.4 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग पकडू शकते, असा दावा कंपनीनं केलाय.
'हे' वाचलंत का :
- Honda Amaze ची तिसरी एडिशन भारतात 4 डिसेंबर रोजी होणार लॉंच
- मारुतीनं लॉंच केली नवीन जनरेशन डिझायर 2024, जबरदस्त फीचर्ससह जाणून घ्या किंमत..
- फक्त 999 रुपयांमध्ये बुक करा Oppo Find X8 फोन, 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप