महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

नवी स्विफ्ट सीएनजी कार लॉन्च, पेट्रोलवर होणाऱ्या खर्चात बजत - New Swift CNG car launched

New Swift CNG car launched : देशातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी मारुती सुझुकीनं सीएनजीसह हॅचबॅक कार स्विफ्ट लाँच केली आहे. कंपनीनं याला झेड सीरीजचं नवीन इंजिन दिलं असून सीएनजीसोबत त्याचं मायलेजही वाढलं आहे. त्यामुळं कारची किंमत काय? त्यात कोणती फिचर आहेत? चला माहिती घेऊया.

New Swift CNG car
स्विफ्ट सीएनजी कार (Maruti Suzuki)

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 13, 2024, 11:34 AM IST

हैदराबाद New Swift CNG car launched :मारुती सुझुकीनं आपल्या नवीन स्विफ्टचं S-CNG मॉडेल लाँच केलं आहे. स्विफ्ट CNG ची 3 प्रकारांमध्ये एक्स-शोरूम किंमत 8.19 लाख रुपये आहे. तसंच कारचं मायलेज 32.85 किमी असल्याचा दावा कंपनीनं केलाय.

नवी स्विफ्ट सीएनजी कार (Maruti Suzuki)

सुझुकी स्विफ्ट सीएनजी किंमत, मायलेज : मारुती सुझुकीनं अखेरीस आपलं सीएनजी मॉडेल (स्विफ्ट एस-सीएनजी) लाँच केल्यानंतर 5 महिन्यांच्या आत नवीन स्विफ्ट अपडेटची ग्राहकांमध्ये प्रचंड मागणी होती. ग्राहक नवीन स्विफ्टच्या सीएनजी प्रकाराची आतुरतेनं वाट पाहत होते. त्यामुळं ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन कंपनीनं 32.85 किमी/किलो मायलेजसह नविन फिचर असलेली स्विफ्ट एस-सीएनजी लॉंच केलीय. चला, तर नवीन मारुती स्विफ्ट एस-सीएनजीची किंमत आणि फिचरसह सर्व माहिती घेऊया.

नवी स्विफ्ट सीएनजी कार (Maruti Suzuki)

नवीन स्विफ्ट CNG च्या सर्व प्रकारांच्या किमती :

मारुती सुझुकी स्विफ्टच्या VXi CNG व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 8 लाख 19 हजार 500 रुपये आहे.

मारुती सुझुकी स्विफ्टच्या VXi (O) CNG प्रकाराची एक्स-शोरूम किंमत 8 लाख 46 हजार 500 रुपये आहे.

मारुती सुझुकी स्विफ्ट व्हेरियंटच्या ZXi CNG प्रकाराची एक्स-शोरूम किंमत 9 लाख 19 हजार 500 रुपये आहे.

नवीन स्विफ्ट सीएनजीची पॉवर आणि मायलेज : मारुती सुझुकीच्या नवीन स्विफ्टमध्ये नवीन 1.2 लीटर जी-सीरीज ड्युअल VVT इंजिन आहे, जे 69.75 PS ची पॉवर आणि 101.8 न्यूटन मीटरचा पीक टॉर्क जनरेट करतं. स्विफ्ट सीएनजीच्या सर्व प्रकारांना 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन मिळतं आणि या हॅचबॅकचं मायलेज 32.85 किमी/किलो पर्यंत आहे, असं कंपनींचं म्हणणे आहे.

स्विफ्ट एस-सीएनजीची वैशिष्ट्ये : नवीन मारुती सुझुकी स्विफ्ट एस-सीएनजी केवळ दिसायलाच सुंदर नाही, तर कंपनीनं त्यात अनेक फीचर्सही दिले आहेत. नवीन स्विफ्ट सीएनजीमध्ये 7-इंचाची स्मार्ट प्ले प्रो इन्फोटेनमेंट सिस्टम, सुझुकी कनेक्ट, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, रीअर एसी व्हेंट्स, वायरलेस चार्जर, 60:40 स्प्लिट रीअर सीट्स, 6 एअरबॅग्ज, हिल होल्ड असिस्ट आणि इलेक्ट्रॉनिक यासह सर्व मानक आणि सुरक्षितता वैशिष्ट्ये आहेत.

'हे' वाचलंत का :

  1. निसान मॅग्नाइट फेसलिफ्ट 4 ऑक्टोबर रोजी होणार लॉन्च - Nissan Magnite facelift
  2. एमजी मोटरची विंडसर ईव्ही लाँच, 331 किमी रेंजसह अनेक फिचर - MG Motor launches Windsor EV
  3. मारुती सुझुकीच्या कारवर मिळतेय बंपर सूट, ग्राहकांचे वाचणार पैसे - discount on Maruti Suzuki cars

ABOUT THE AUTHOR

...view details