हैदराबाद Mahindra Biogas CBG Tractor: देशाचं वाहन क्षेत्र तंत्रज्ञानामुळं अधिक मजबूत होत होताना दिसत आहे. तंत्रज्ञानाची हवा शतकऱ्यांपर्यंत देखील पोहचलीय. देशातील आघाडीची ट्रॅक्टर उत्पादक कंपनी महिंद्रा ट्रॅक्टर्सनं आता पहिला कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) ट्रॅक्टर सादर केला आहे. कंपनीनं या नवीन ट्रॅक्टरला महिंद्रा युवो टेक+ असं नाव दिलं आहे. या ट्रॅक्टरचा शेतकऱ्यांना अनेक प्रकारे फायदा होणार आहे. इतकंच नाही, तर शक्तिशाली इंजिन, प्रगत तंत्रज्ञान असलेल्या या ट्रॅक्टरच्या लोकार्पण सोहळ्याला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते.
कसं आहे महिंद्रा युवो टेक+?: दिसायला आणि डिझाइनमध्ये, महिंद्रा युवो टेक+सामान्य ट्रॅक्टरसारखं दिसतं. त्याची यंत्रणा डिझेल ट्रॅक्टरसारखी काम करते. मात्र, त्यात डिझेलऐवजी बायोगॅसचा वापर इंधन म्हणून केला जातोय. या ट्रॅक्टरच्या उत्पादनासाठी तयार मॉडेल येण्यास बाजारात येण्यास वेळ लागणार आहे. महिंद्रा या ट्रॅक्टरवर काम करत आहे. यामुळं देशातील शेतकऱ्यांना ते अधिक सहज आणि परवडणाऱ्या किमतीत लवकरच उपलब्ध होणार आहे. महिंद्रा युवो टेक + सीबीजी ट्रॅक्टर पारंपारिक डिझेल ट्रॅक्टच्या शक्ती सारखच काम करण्यास सक्षम असल्याचा दावा केला जातोय. CBG ट्रॅक्टर तंत्रज्ञानाचा उद्देश शेतकरी, पर्यावरणाचं रक्षण करणं असल्याचं कंपनीनं अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. महिंद्रा सीबीजी ट्रॅक्टरमुळं प्रदूषण आणि कार्बन उत्सर्जन कमी होण्याची अपेक्षा आहे.