हैदराबाद : 'आत्मनिर्भर भारत' आणि 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत बुधवारी सहावी स्कॉर्पिन पाणबुडी 'वागशीर' भारतीय नौदलाला सोपवण्यात आलीय. ही पाणबुडी 'आयएनएस वागशीर' म्हणून भारतीय नौदलात समाविष्ट केली जाणार आहे. भारतीय नौदलासाठी बनवलेली शिकारी-किलर पाणबुडी आयएनएस वागशीरच्या गेल्या 18 मे 2024 पासून समुद्री चाचण्या सुरू होत्या. या पाणबुडीमध्ये शत्रूवर विनाशकारी हल्ला करण्याची क्षमता आहे. जहाजविरोधी क्षेपणास्त्रांनी हा हल्ला पाण्याखाली किंवा पृष्ठभागावर केला जाऊ शकतो. वागशीर विविध मोहिमावर काम करु शकते. यामध्ये पृष्ठभागावरील युद्धविरोधी, पाणबुडीविरोधी युद्ध, गुप्तचर माहिती गोळा करणे, पाळत ठेवणे इत्यादींचा समावेश आहे. ही पाणबुडी नौदल टास्क फोर्सच्या इतर घटकांसह ऑपरेशनच्या सर्व क्षेत्रांमध्ये कार्य करण्यासाठी डिझाइन केलेली आहे.
शक्तिशाली पाणबुडी
या पाणबुडीमध्ये अत्याधुनिक इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टम (IPMS) आणि कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टम (CMS) सह उच्च दर्जाचे ऑटोमेशन आहे. ही पाणबुडी विविध उपकरण प्रणाली आणि सेन्सर्सना एका प्रभावी प्लॅटफॉर्ममध्ये एकत्रित करते. या अत्याधुनिक वैशिष्ट्यांमध्ये प्रगत ध्वनिक सायलेन्सिंग तंत्रज्ञान, कमी रेडिएटेड नॉइज लेव्हल, हायड्रोडायनॅमिकली ऑप्टिमाइज्ड आकार आणि अचूक मार्गदर्शित शस्त्रे वापरून शत्रूवर हल्ला करण्याची क्षमता यासारख्या उत्कृष्ट स्टेल्थ वैशिष्ट्यांचा समावेश आहे. या शक्तिशाली प्लॅटफॉर्मची गुप्तता वाढवण्यासाठी, ध्वनिक, ऑप्टिकल, इलेक्ट्रो-मॅग्नेटिक आणि इन्फ्रारेड सिग्नेचर कमी करण्यावर विशेष लक्ष दिलं गेलं आहे. या गुप्त वैशिष्ट्यांमुळं त्याला अशी अभेद्यता मिळते, जी जगातील बहुतेक पाणबुड्यांमध्ये अतुलनीय आहे. याव्यतिरिक्त, वागशीर मागील पाच बोटींपेक्षा वेगळी आहे. कारण त्यात मुख्य बॅटरी आणि Ku-बँड SATCOM व्यतिरिक्त स्वदेशी विकसित एअर कंडिशनिंग प्लांट आणि अंतर्गत संप्रेषण आणि प्रसारण प्रणाली बसवल्या आहेत.