हैदराबाद :भारतीय रेल्वेनं जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन रेल्वे इंजिन विकसित केलं आहे. भारतीय रेल्वेने विकसित केलेलं हायड्रोजन-इंधनयुक्त ट्रेन इंजिन हे जगातील सर्वात जास्त हॉर्सपॉवर इंजिन आहे, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलीय. यासोबतच, वैष्णव म्हणाले की, "जगातील फक्त चार देश असं हायड्रोजन-इंधनयुक्त इंजिन बनवतात. " हे देश 500 ते 600 हॉर्सपॉवर दरम्यान इंजिन तयार करतात, तर भारतीय रेल्वेनं स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेल्या इंजिनची क्षमता 1200 हॉर्सपॉवर आहे, जी या श्रेणीतील आतापर्यंतची सर्वाधिक आहे. या इंजिनचे उत्पादन काम पूर्ण झाले असून सिस्टम इंटिग्रेशनचं काम सुरू आहे. हे इंजिन पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित आहे."
इंजिनची पहिली चाचणी :या इंजिनची पहिली चाचणी हरियाणातील जिंद-सोनीपत मार्गावर होईल. 89 किमी लांबीच्या या मार्गावर हायड्रोजन ट्रेनची चाचणी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. रेल्वे मंत्रालयानं 2023-24 या आर्थिक वर्षात 35 हायड्रोजन फ्युएल सेल ट्रेन विकसित करण्यासाठी 2800 कोटी रुपयांच्या बजेटचं वाटप केलं आहे.
हायड्रोजन ट्रेन इंजिनची प्रमुख वैशिष्ट्ये
- पॉवर आउटपुट : 1200 हॉर्सपॉवर जगातील सर्वात मोठं हायड्रोजन इंजिन.
- तंत्रज्ञान : भारतातील स्थानिक कौशल्याचा वापर करून पूर्णपणे विकसित.
- चाचणी मार्ग : हरियाणामधील जिंद-सोनीपत.
- ग्रीन माइलस्टोन : हायड्रोजन-चालित वाहतुकीकडं भारताची वाटचाल.
हायड्रोजन ट्रेनचे फायदे
हायड्रोजन ट्रेन इंजिन पर्यावरण संरक्षणासाठी वरदान ठरणार आहे. हायड्रोजन इंधनाचा वापरून ही ट्रेन शून्य कार्बन उत्सर्जित करेल. यामुळं भारताचे स्वच्छ ऊर्जा आणि हरित उर्जा वाहतूक उद्दिष्टे साध्य होण्यास मदत होणार आहे.
- शून्य उत्सर्जनहायड्रोजन ट्रेन ऑपरेशन दरम्यान फक्त पाण्याची वाफ आणि उष्णता निर्माण करतात. त्यामुळं वायू प्रदूषण किंवा कार्बन उत्सर्जन होत नाही.
- नवीकरणीय ऊर्जासौर, वारा किंवा अणुऊर्जा यासारख्या अक्षय ऊर्जा स्रोतांपासून हायड्रोजन बनवता येतं.
- इंधन भरण्यास कमी वेळहायड्रोजन इंधन लवकर भरता येतं.
- लांब पल्ल्यासाठी फायदेशीर हायड्रोजन इंधनामुळे ट्रेन कमी इंधनात जास्त अंतर कापू शकतात.
- ध्वनी प्रदुषण कमी हायड्रोजन इंजिनचा जास्त आवाज होत नाही. त्यामुळं ध्वनी प्रदूषण कमी होतं.
- द्वि-मोडहायड्रोजन ट्रेन विद्युतीकृत आणि पारंपारिक दोन्ही मार्गांवर धावू शकतात.
- कमी उत्सर्जन हायड्रोजन इंधन स्वच्छ उर्जेपासून तयार केल्यास हायड्रोजन ट्रेन प्रदूषण कमी करण्यात मदत करू शकतात.
- कार्बनहायड्रोजन ट्रेन जागतीक प्रदुषण टाळण्यासाठी महत्वचा दुवा ठरु शकतात. यातून कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत होऊ शकते. यात हायड्रोजन आणि ऑक्सिजनमधील इलेक्ट्रोकेमिकल अभिक्रियेद्वारे वीज निर्माण होते. हायड्रोजनची ऊर्जा घनता सध्या डिझेलपेक्षा कमी आहे, ज्यामुळं ती कमी आवाज करते.
- देशांतर्गत उत्पादननैसर्गिक वायू, अणुऊर्जा, बायोमास आणि सौर आणि वारा यासारख्या विविध घरगुती संसाधनांमधून हायड्रोजन तयार केलं जाऊ शकतं.
हायड्रोजन इंधनाचे तोटे
- किंमत: हायड्रोजन इंधनाचे उत्पादन आणि साठवणूक महाग असते.
- पायाभूत सुविधा :हायड्रोजन वाहनांमध्ये इंधन भरण्यासाठी सध्या ठरावीक जागा आहेत. हायड्रोजन वितरित करण्यासाठी आवश्यक असलेली पायाभूत सुविधा अजूनही विकसित केली जात आहे.
- सुरक्षितता : हायड्रोजन अत्यंत ज्वलनशील आणि स्फोटक असतं. त्याच्या वापराबाबत सुरक्षिततेची चिंता आहे.
- शाश्वतता :हायड्रोजन उत्पादन सध्या ऊर्जा-केंद्रित आहे आणि जीवाश्म इंधनांवर अवलंबून आहे.
- उत्पादन वेळ :इलेक्ट्रोलिसिसद्वारे हायड्रोजन तयार करण्यास वेळ लागतो.
हे वाचलंत का :
- भविष्यातील इंधन म्हणून हायड्रोजनची जोखीम - Hydrogen as a Fuel of the Future
- ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील इंधन होणार; ते पेट्रोल, डिझेलपेक्षा स्वस्त - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
- देशातील पहिला एलएनजी रिफिलिंग स्टेशन विदर्भात सुरू; केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते झाले उद्घाटन