नवी दिल्लीQuantum and 6G technologies : क्वांटम तंत्रज्ञानात भारताचं नेतृत्व मजबूत करण्यासाठी एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. हा करार टेलिकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स (TCoE) इंडिया आणि विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (VTU) - विश्वेश्वरय्या रिसर्च अँड इनोव्हेशन फाउंडेशन (VRIF) यांच्यात करण्यात आला. हा ऐतिहासिक सामंजस्य करार क्वांटम तंत्रज्ञान, संबंधित 5-G/6-G तंत्रज्ञान इत्यादी आणि R&D च्या इतर प्रमुख क्षेत्रांमध्ये सेंटर्स ऑफ एक्सलन्स (CoE) स्थापन करण्यासाठी आहे. विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (VTU) - विश्वेश्वरय्या रिसर्च अँड इनोव्हेशन फाऊंडेशन (VRIF) चे मुख्यालय बंगळुरू येथे आहे. या सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्दिष्ट या प्रमुख क्षेत्रांमध्ये भारताच्या प्रगतीला गती देण्याचं आहे.
संशोधन आणि नवोपक्रमाला चालना : सेंटर ऑफ एक्सलन्स हे हब-अँड-स्पोक मॉडेलवर डिझाइन केलेलं आहे. ज्यामध्ये विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (VTU) - विश्वेश्वरय्या रिसर्च अँड इनोव्हेशन फाउंडेशन (VRIF) आणि टेलीकॉम सेंटर ऑफ एक्सलन्स (TCoE) इंडिया हे केंद्रीय केंद्र म्हणून काम करत आहेत. विश्वेश्वरय्या टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (VTU) च्या 228 संलग्न महाविद्यालयांच्या बौद्धिक, पायाभूत सुविधांचा उपयोग करून, सेंटर ऑफ एक्सलन्स संशोधन विकासामध्ये एक प्रमुख सुत्रधार म्हणून काम करेल. या मॉडेलद्वारे, सेंटर ऑफ एक्सलन्स क्वांटम आणि संबंधित 5-जी/6-जी तंत्रज्ञानामध्ये अत्याधुनिक संशोधन करेल.