हैदराबाद IGNOU प्रवेश 2025 : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) नं जानेवारी 2025 सत्रासाठी ओपन डिस्टन्स लर्निंग (ODL) अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2025 आहे. ODL मोडद्वारे IGNOU मधून अनेक प्रकारचे पदवीपूर्व, पदव्युत्तर, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला तुम्ही प्रवेश घेऊ शकता.
IGNOU प्रवेश फॉर्म :तुम्हाला अधिक माहितीसाठी ignouadmission.samarth.edu.in या वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना IGNOU प्रवेश फॉर्म 2025 भरायचा आहे, त्यांना DEB ID तयार करावा लागेल. यूजीसीच्या नियमांनुसार हे अनिवार्य आहे. अर्ज सादर करण्यासाठी DEB ID आवश्यक आहे. याशिवाय पात्र विद्यार्थी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल (NSP) Scholarships.gov.in वर प्रवेश निश्चित झाल्यानंतर भारत सरकारच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.
ऑनलाइन अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता नावनोंदणी करण्यापूर्वी UGC DEB (Distance Education Bureau) पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. नोंदणीनंतर, विद्यार्थ्यांचा आभासी DEB-ID तयार होईल. या आयडीद्वारे अभ्यासक्रमापासून ते प्रगतीपर्यंतचा विद्यार्थ्यांचा अहवाल नोंदवला जाईल. विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) देखील या आयडीसह बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांचा मागोवा घेण्यास सक्षम असेल. विद्यार्थी त्यांच्या ABC आयडी (शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट आयडी) वरून त्यांचा अद्वितीय DEB आयडी तयार करू शकतात.
जानेवारी 2025 सत्रासाठी पुनर्नोंदणी प्रक्रियाही सुरू आहे. 31 जानेवारी 2025 पर्यंत पुनर्नोंदणी करता येईल. तुम्ही विविध ओपन अँड डिस्टन्स लर्निंग (ODL) प्रोग्राम आणि ऑनलाइन प्रोग्राममध्ये प्रवेश घेऊ शकता.
इग्नूसाठी असा करा अर्ज :
1. सर्व प्रथम उमेदवाराला IGNOU च्या अधिकृत वेबसाइट ignou.ac.in वर जावं लागेल.
2. यानंतर तुम्हाला जानेवारी 2025 सत्रासाठी री-रजिस्ट्रेशन' वर क्लिक करावं लागेल.
3. आता तुम्हाला प्रथम स्वतःची नोंदणी करावी लागेल, यासाठी तुम्हाला ‘नवीन नोंदणी’ वर क्लिक करावं लागेल. यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकावा लागेल आणि सबमिट क्लिक करावं लागेल.
4. नोंदणी केल्यानंतर, तुम्हाला अर्ज भरावा लागेल.