हैदराबाद : Huawei नं आपला नवीन Mate 70 Pro स्मार्टफोन लॉंच केला आहे. हा फोन 50MP सुपर-फोकस कॅमेरा, 40MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 48MP सुपर-फोकस मॅक्रो टेलिफोटो कॅमेरासह येतो.
Huawei Mate 70 Pro लॉंच :Huawei नं आपला नवीन Mate 70 Pro स्मार्टफोन बाजारात आणला आहे. हा फोन शक्तिशाली वैशिष्ट्ये आणि प्रगत कॅमेरा सेटअपसह येते. HUAWEI Mate 70 सीरीजमध्ये कंपनी आपल्या नवीन स्मार्टफोनचा विस्तार करत आहे. आज आपण नवीन Mate 70 Pro मधील फीचर आणि किंमतीबद्दल जाणून घेऊया...
Huawei Mate 70 Pro चे फीचर : Huawei Mate 70 Pro मध्ये 6.9-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले आहे, जो 120Hz व्हेरिएबल रिफ्रेश रेटसह येतो. तसंच या फोनला Kunlun Glass चं संरक्षण दिलं गेलं आहे. फोनला पॉवरिंग 5,500mAh बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 100W सुपरफास्ट चार्जिंग आणि 80W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.