हैदराबाद :Jio सिमवर स्पॅम कॉल आणि बनावट SMS ब्लॉक करायचा अतिशय सोपा मार्ग आहे. वापरकर्ते त्यांच्या आवडीनुसार अनुकूल पर्याय देखील निवडू शकतात. यामुळं, तुम्हाला स्पॅम कॉल येणार नाहीत. पण महत्त्वाचे कॉल येत राहतील. जिओवर स्पॅम कॉल कसे बंद कराचे चला जाणून घेऊया..
स्पॅम कॉल्स कायमचे बंद : तुम्ही स्पॅम कॉल्स आणि फेक एसएमएसला कंटाळला असाल. मात्र यापासून आता तुम्हाला मुक्ती मिळणार आहे. Jio सिम वापरकर्त्यांनी स्पॅम कॉल्स आणि मेसेज कसे ब्लॉक करावे याबद्दल माहिती घेणार आहोत. स्पॅम कॉल्स आणि फेक मेसेजपासून स्वत:ला सुरक्षित ठेवणे एक आव्हान बनलं आहे. सायबर स्कॅमर लोकांना फसवण्यासाठी रोबोकॉलसारखं तंत्र वापरत आहेत. म्हणून, जर तुमच्याकडं Jio सिम असेल, तर तुम्ही खाली नमूद दिलेल्या पद्धतीनं त्यांना त्वरित ब्लॉक करू शकता.
Jio स्पॅम कॉल ब्लॉक करण्याची पद्धत :MyJio ॲपद्वारे बटणावर क्लिक करून अवांछित कॉल आणि संदेश ब्लॉक करण्याचा एक सोपा मार्ग आहे. ओटीपीसह ब्रँडकडून महत्त्वाचे संदेश आणि अपडेट मिळवताना वापरकर्ते स्पॅम कॉल पूर्णपणे ब्लॉक करू शकतात. तसंच जाहिरात कॉल्सला अंशत: ब्लॉक करण्याचा पर्याय देखील उपलब्ध आहे.