हैदराबाद How to Get a Driving License :ऑनलाइन ॲप्लिकेशन सेवा सुरू झाल्यामुळं भारतात ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याची प्रक्रिया अधिक सोयीस्कर आणि कार्यक्षम बनली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय (MoRTH) आणि राज्य प्रादेशिक परिवहन कार्यालयानं (RTOs)नागरिकांसाठी परिवर्तन सेवा पोर्टलद्वारे ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी केली. यात शिकाऊ आणि कायमस्वरूपी काम करणाऱ्या चालकांना लायसन्स काढता येतं. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा, ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी काय पात्रता हवी इत्यादीबाबत आज आपण माहिती घेणार आहोत.
1 पात्रता निकष तपासा :भारतात ड्रायव्हिंग लायसन्सचा ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी, आवश्यक पात्रता निकष पूर्ण करणं आवश्यक आहे.
किमान वय :गीअरशिवाय चालणाऱ्या दुचाकीसाठी 16 वर्षे वयाची अट आहे. त्यातासाठी तुमच्या पालकाची संमती देखील लागेल. गीअरसह दुचाकी आणि हलके मोटार वाहन (LMV) चालवण्यासाठी 18 वयाची वर्षे पूर्ण करणं गरजेचं आहे. व्यावसायिक वाहनाच्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठी20 वर्षे वयाची अट आहे.
शैक्षणिक पात्रता : वैयक्तिक ड्रायव्हिंग लायसन्ससाठी औपचारिक शिक्षणाची आवश्यकता नाही. तथापि, व्यावसायिक परवान्यासाठी, मूलभूत साक्षरता आवश्यक असू शकते.
फिटनेस :50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या किंवा व्यावसायिक परवान्यांसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य आहे. अर्जदार शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या वाहन चालविण्यास तंदुरुस्त असला पाहिजे.
2 परिवर्तन सेवा वेबसाइटला भेट द्या : ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्ही अधिकृत परिवहन सेवा पोर्टलला (https://parivahan.gov.in/parivahan/) भेट द्यावी. ही वेबसाईट रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाद्वारे तयार करण्यात आली आहे. परिवहन सेवेच्या अधिकृत वेबसाइटवर जा. नंतर तुमचं राज्य निवडा. तुम्ही ज्या राज्यात ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करू इच्छिता, ते निवडा, कारण RTO च्या सेवा राज्यानुसार बदलतात.
3 परवान्याचा प्रकार निवडा : पोर्टलवर, तुमच्या सध्याच्या परवान्याच्या स्थितीनुसार तुम्हाला दोन मुख्य पर्याय सापडतील:
Learner's License : तुम्ही पहिल्यांदाच परवान्यासाठी अर्ज करत असाल तर "Learner’s License" हा पर्याय निवडा. तुम्ही कायमस्वरूपी परवान्यासाठी अर्ज करण्यापूर्वी हे आवश्यक आहे.
कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्स :तुमच्याकडं आधीच शिकाऊ परवाना असल्यास आणि कायमस्वरूपी परवान्यासाठी अर्ज करायचा असल्यास, "कायमचा ड्रायव्हिंग परवाना" पर्याय निवडा.
4 ऑनलाइन अर्ज भरा :तुम्ही ज्या प्रकारचा परवाना अर्ज करू इच्छिता तो निवडल्यानंतर, पुढील पायरी म्हणजे ऑनलाइन अर्ज भरणे.
वैयक्तिक माहिती :तुमचं नाव, वय, पत्ता आणि संपर्क इत्यादी तपशील प्रविष्ट करा.
परवाना तपशील : तुम्हाला ज्या वाहनासाठी परवाना आवश्यक आहे, त्याचा प्रकार निवडा (उदा. गियर असलेली मोटरसायकल, LMV इ.).
कागदपत्र अपलोड करा : तुम्हाला खालील कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड कराव्या लागतील. वयाचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड इ.), पत्त्याचा पुरावा (उपयोगिता बिल, भाडे करार, पासपोर्ट इ.), पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, वैद्यकीय प्रमाणपत्र (लागू असल्यास, विशेषतः व्यावसायिक किंवा वरिष्ठ अर्जदारांसाठी).
5 शिकाऊ परवाना चाचणीसाठी स्लॉट बुक करा :कायम ड्रायव्हिंग परवाना मिळवण्यापूर्वी शिकाऊ परवाना चाचणी उत्तीर्ण करणं आवश्यक आहे. तुमचा फॉर्म सबमिट केल्यानंतर, तुमची चाचणी शेड्यूल करण्यासाठी खाली पायऱ्या फॉलो करा.
चाचणी स्थान निवडा : चाचणीसाठी तुमच्या जवळचं RTO कार्यालय निवडा.