हैदराबाद pager explode in Lebanon : लेबनॉनची राजधानी बेरूतमध्ये लेबनीज निमलष्करी संघटना हिजबुल्लाह दहशतवाद्यांच्या खिशातील पेजरचा स्फोट होऊन हजारो लोक जखमी झाले. हे पेजर हिजबुल्ला एकमेकांशी संवाद साधण्यासाठी वापरत होते. एकाच वेळी झालेल्या स्फोटांनी देशभरात खळबळ उडालीय. या स्फोटांमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला असून 2 हजार 750 लोक जखमी झाले आहेत. यामध्ये अनेक जण गंभीर जखमी झाल्याचं लेबनीज आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.
काय आहे पेजर? : जेव्हा मोबाईल अस्तित्वात नव्हते, तेव्हा पेजर हे संवादाचं साधन होतं. या पेजर्सचा वापर मेसेजिंगसाठी केला जात असे. पेजरचा वापर 90 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 2000 च्या सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणावर केला गेला. हे पेजर अनेक लोकांच्या बेल्टला लावलेले असायचे. या पेजरला छोटं स्क्रिन होतं, ज्यावर संदेश दिसत होता. न्यूमेरिक पेजर्सवर फक्त फोन नंबर दाखवला जात होता. मोबाइल फोनच्या विपरीत, पेजर रेडिओ लहरींवर काम करतं. ऑपरेटर रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे संदेश पाठवतो जातो. याला इंटरनेटची देखील गरज नसते. प्रत्येक पेजरला एक नंबर असतो. कॉल करून, तुम्ही हा नंबर असलेल्या व्यक्तीसाठी ऑपरेटरला संदेश देऊ शकता. हा संदेश रेडिओ फ्रिक्वेन्सी वापरून पेजरवर प्रसारित केला जातो. मेसेज आल्यावर पेजर बीप किंवा कंपन करतं. पेजरवर फक्त मेसेज मिळू शकतात. पेजरच्या माध्यमातून मेसेजचं उत्तरही दिलं जाऊ शकतं. असं मानलं जातं की पेजरमध्ये वापरलेलं मूलभूत तंत्रज्ञान तसंच भौतिक हार्डवेअरवरला ट्रॅक करणं कठीण आहे. त्यामुळं ते हिजबुल्लाहसारख्या गटांमध्ये लोकप्रिय झाले होते.
कुठे झाला हल्ला ? : लेबनॉनची राजधानी बेरूत आणि देशाच्या इतर भागांमध्ये मंगळवारी (17 सप्टेंबर) स्थानिक वेळेनुसार दुपारी 3:45 वाजता स्फोट सुरू झाले. यात मृतांच्या संख्येची अद्याप पुष्टी केली जात आहे. मृतांमध्ये एका आठ वर्षांच्या मुलीची पुष्टी झाली आहे. हिजबुल्लाहचे खासदार अली अम्मार यांचा मुलगा मोहम्मद महदी अम्मर याचाही मृत्यू झाल्याची माहिती आहे. हिजबुल्लानं त्याचे दोन सैनिक ठार झाल्याची कबुली दिलीय. लेबनीजचे आरोग्य मंत्री फिरास अबियाद यांनी अल जझीरा या वृत्तवाहीनीला सांगितलं: “सुमारे 2 हजार 750 लोक जखमी यात झाले आहेत. त्यापैकी 200 हून अधिक जण गंभीर” जखमी आहेत. बहुतेकांच्या चेहरा, हात, पोटाला गंभीर इचा पोहचल्या आहेत.