महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

फोर्ड पुन्हा सुरू करणार भारतात उत्पादन, 3 वर्षांपूर्वी केला होता देशात व्यावसाय बंद - Ford Motor - FORD MOTOR

Ford Motor : 3 वर्षांपूर्वी भारत सोडून गेलेल्या अमेरिकन कंपनी फोर्डनं पुन्हा परत येण्याची घोषणा केली आहे. कंपनीनं तामिळनाडूमधील त्यांच्या प्लांटमध्ये पुन्हा वाहन तयार करण्याबाबत चर्चा सुरू केलीय.

Ford Motor
प्रातिनिधिक छायाचित्र (Etv Bharat National Desk)

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 13, 2024, 4:36 PM IST

Updated : Sep 13, 2024, 4:45 PM IST

हैदराबाद Ford Motor : सुमारे 3 वर्षांपूर्वी भारतातून आपला व्यवसाय बंद करण्याची घोषणा करणाऱ्या अमेरिकन वाहन उत्पादक कंपनी फोर्ड भारतात परत येत आहे. कंपनीनं पुन्हा एकदा भारतात उत्पादन सुरू करणार असल्याचं म्हटलं आहे. तामिळनाडूमधील त्यांच्या प्लांटमध्ये पुन्हा कारची निर्मिती करण्यात येणार आहे. याबाबत कंपनीनं सरकारला पत्रही लिहून माहिती दिली आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या अमेरिकन दौऱ्यात झालेल्या भेटीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

'कंपनीची भारताप्रती बांधिलकी आहे. कारण नवीन जागतिक बाजारपेठांमध्ये सेवा देण्यासाठी तमिळनाडूमध्ये उपलब्ध उत्पादन कौशल्याचा फायदा घेण्याचा आमचा मानस आहे. - के. हार्ट, अध्यक्ष, फोर्ड इंटरनॅशनल मार्केट ग्रुप.

उत्पादन सुरू करणार :अमेरिकन ऑटोमोबाईल उत्पादक फोर्डनं शुक्रवारी सांगितलं, की ते केवळ भारतातून निर्यात करण्यासाठी वाहनांचं उत्पादन सुरू करणार आहे. यासाठी कंपनीनं चेन्नईत उत्पादन प्रकल्पाची तयारीही सुरू केली आहे. कंपनीनं यासंदर्भात तामिळनाडू सरकारलाही कळवलं असल्याचं सांगितलं. लवकरच या प्लांटमध्ये पुन्हा वाहनांची निर्मिती सुरू होणार आहे.

तामिळनाडू सरकारला पत्र :कंपनीनं 2021 मध्ये भारतात वाहनांचं उत्पादन बंद करण्याची घोषणा केली होती, परंतु आता त्यांनी तामिळनाडू सरकारला पत्र (LOI) दिलं आहे. यामध्ये चेन्नई प्लांटचा उत्पादनासाठी निर्यातीसाठी वापर करण्याचा विचार निश्चित करण्यात आला आहे. फोर्डनं एका निवेदनात म्हटले आहे की, फोर्डचे नेतृत्व आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या अमेरिका भेटीदरम्यान झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे.

हे वाचलंत का :

  1. नवी स्विफ्ट सीएनजी कार लॉन्च, पेट्रोलवर होणाऱ्या खर्चात बजत - New Swift CNG car launched
  2. निसान मॅग्नाइट फेसलिफ्ट 4 ऑक्टोबर रोजी होणार लॉन्च - Nissan Magnite facelift
  3. एमजी मोटरची विंडसर ईव्ही लाँच, 331 किमी रेंजसह अनेक फिचर - MG Motor launches Windsor EV
Last Updated : Sep 13, 2024, 4:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details