महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

पेट्रोलपासून मुक्ती : इथेनॉलवर चालणारी बजाज पल्सर NS160 सादर - Ethanol powered Bajaj Pulsar NS160 - ETHANOL POWERED BAJAJ PULSAR NS160

BAJAJ PULSAR NS160 BIKE : पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीमुळं पर्यायी इंधनाचा वापर सुरू झाला आहे. भारतातील मोटरसायकल उत्पादक कंपनी बजाज ऑटो पर्यायी इंधनावर काम करत आहे. बजाजनं नुकतीच पल्सर NS160 दुचाकी प्रदर्शित केलीय. ही दुचाकी 100% इथेनॉलवर चालण्यास सक्षम आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Tech Team

Published : Sep 6, 2024, 11:49 AM IST

हैदराबाद BAJAJ PULSAR NS160 BIKE :बजाज ऑटो सतत नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे. अलीकडेच कंपनीनं जगातील पहिली CNG बाईक Bajaj Freedom 125 लाँच केली. आता कंपनीनं इंडिया बायो-एनर्जी अँड टेक (IBET) एक्स्पो 2024 मध्ये प्रसिद्ध बाइक बजाज पल्सर NS160 ची नवीन इथेनॉल इंधन आवृत्ती प्रदर्शित केली. या दोन दिवसीय एक्स्पोमध्ये शाश्वत इंधनाशी संबंधित उत्पादनं प्रदर्शित करण्यात आले. हे प्रदर्शिन इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी आणि एमएम ॲक्टिव्ह साय-टेक कम्युनिकेशन्स यांनी संयुक्तपणे आयोजित केलं होतं.

पल्सर NS160 दुचाकी (BAJAJ Auto)

फ्लेक्स-इंधन म्हणजे काय : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी अनेकदा फ्लेक्स-इंधन इंजिनसह सुसज्ज वाहनांच्या निर्मितीचं समर्थन केलं आहे. फ्लेक्स इंधन हे पेट्रोल आणि इथेनॉल किंवा मिथेनॉल सारख्या इतर इंधनांच्या मिश्रणापासून बनवलेलं पर्यायी इंधन आहे. फ्लेक्स इंधन वाहनांमध्ये नियमित (ICE) अंतर्गत ज्वलन इंजिन असतं. ते एकापेक्षा जास्त प्रकारच्या इंधनावर चालण्यासाठी डिझाइन केलेलं असते.

पल्सर NS160 दुचाकी (BAJAJ Auto)

फ्लेक्स इंधन पल्सर कशी आहे : बजाज पल्सर NS160 फ्लेक्स इंधन इथेनॉल आणि पेट्रोलच्या मिश्रणावर चालते. याशिवाय बजाज ऑटोनं अद्याप या बाईकबाबत जास्त माहिती दिलेली नाही. काही काळापासून भारत सरकार E80/E100 इथेनॉलवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देत आहे. TVS इथेनॉल बाईकवर देखील काम करत आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी Apache RTR 200 चे फ्लेक्स इंधन मॉडेल प्रदर्शित केलं होतं. ब्राझील आणि इतर दक्षिण अमेरिकन देशांमध्ये, E80/100 इंधनाचा वापर खूप जास्त आहे.

पल्सर NS160 दुचाकी (BAJAJ Auto)

पल्सर NS160 फिचर : पेट्रोलवर चालणाऱ्या पल्सर NS160 मध्ये 160.3 cc क्षमतेचे सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. जे 17.2PS पॉवर आणि 14.6Nm टॉर्क जनरेट करतं. सस्पेंशन सेटअपमध्ये टेलिस्कोपिक फोर्क आणि मोनोशॉकचा समावेश आहे, तर ब्रेकिंगसाठी 300 मिमी फ्रंट डिस्क ब्रेक आणि 230 मिमी मागील डिस्क ब्रेक वापरण्यात आले आहेत. पल्सर NS160 फ्लेक्स इंधनासोबत, बजाज ऑटोने IBET एक्स्पो 2024 मध्ये नुकतीच लाँच केलेली बजाज फ्रीडम 125 CNG बाइक देखील प्रदर्शित केली. ज्याची सुरुवातीची किंमत 95,000 रुपये (एक्स-शोरूम) आहे. ही बाईक एकूण तीन प्रकारांमध्ये येते ज्यामध्ये ड्रम आणि डिस्क ब्रेकचा पर्याय उपलब्ध आहे.

पल्सर NS160 दुचाकी (BAJAJ Auto)

'हे' वाचलंत का :

  1. Hyundai Creta SUV नाईट एडिशन लॉन्च, काय आहेत फिचर? जाणून घ्या - Hyundai Creta Knight Edition
  2. फ्लिपकार्टचा बिग बिलियन डेज सेल 'या' तारखेपासून सुरू, 80% पर्यंत मिळणार सूट - Flipkart Big Billion Days 2024
  3. वीज बिल जास्त येतयं? आता काळजी कशाला करता, 'या' टिप्स फॉलो करून करा विजेसह पैशाची बचत - Save money save electricity

ABOUT THE AUTHOR

...view details