महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

श्वानांना समजतात शब्द, 30 श्वानांच्या संशोधनातून आलं समोर - Dogs Understand Words - DOGS UNDERSTAND WORDS

Dogs Understand Words : साउंडबोर्ड बटणांचा वापर करून प्रशिक्षित श्वान विशिष्ट शब्द समजू शकतात. तसंच अशा शब्दांना ते प्रतिसाद देऊ शकतात, असं एका नवीन अभ्यासातून समोर आलं आहे. संशोधकांना आढळून आलं की श्वान "खेळणं, बाहेर अशा शब्दांना योग्य प्रतिसाद दितंय. त्यामुळं श्वानं शब्दांच योग्य आकलन करत असल्याचं यातून संशोधकांनी म्हटलं आहे.

Dogs
श्वान (Etv Bharat)

By ETV Bharat Tech Team

Published : Aug 30, 2024, 11:23 AM IST

सॅन डिएगोDogs Understand Words :तुम्ही श्वानाचे अनेक व्हायरल व्हिडिओ पाहिले असतील, ज्यात श्वान मालकाच्या शब्दांना प्रतिसाद देताना तुम्हाला दिसलं असेल. तसंच श्वानांना बोलण्यासाठी साउंडबोर्ड बटणाचा वापर करताना तुम्ही अनेकांना पाहिलं असेल. साउंडबोर्ड बटणाचा वापर करून तुमचं प्रशिक्षित श्वानं देखील तुमचे शब्द ओळखू शकतं. TikTok तसंच Instagram सारख्या प्लॅटफॉर्मवर असे विविध व्हिडिओ आपल्याला दिसताय. परंतु हे श्वान खरोखरच संवाद साधत आहेत, किंवा ते फक्त मालकांच्या संकेतांना प्रतिसाद देत आहेत? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच? मात्र, एका संशोधनात श्वानं तुमच्या शब्दांना प्रतिसाद देत असल्याचं सिद्ध झालंय.

30 श्वानवर संशोधन : साउंडबोर्ड बटणांसह प्रशिक्षित श्वान विशिष्ट शब्द समजू शकतात, असं PLOS ONE मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासातून दिसून आलं आहे. हे संशोधन कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी ऑफ सॅन डिएगोसह इतर संस्थांच्या संशोधकांनी केलंय. UC सॅन डिएगो येथील संज्ञानात्मक विज्ञान विभागातील सहयोगी प्राध्यापक फेडेरिको रोसानो यांच्या नेतृत्वात, प्रशिक्षित पाळीव प्राण्यांवरील केलेला हा पहिलाच अभ्यास आहे. संशोधनात दोन पूरक प्रयोगांचा समावेश करण्यात आला होता. प्रथम संशोधन वैयक्तिक श्वानावर करण्यात आलं. त्यानंतर संशोधकांनी साउंडबोर्ड बटणांवरील श्वानाच्या प्रतिसादांची चाचणी घेण्यासाठी देशभरातील 30 श्वानवर संशोधन केलं. दुसऱ्या प्रयोगात 29 श्वानांच्या मालकांनी स्वतः घरी चाचण्या घेतल्या.

मुख्य निष्कर्ष :अभ्यासातून असं दिसून आलं, की साउंडबोर्ड वापरण्यासाठी प्रशिक्षित श्वानांनी “प्ले” आणि “बाहेर” सारख्या शब्दांना योग्य प्रतिसाद दिला. हे शब्द श्वानाच्या मालकांनी किंवा साउंडबोर्ड बटण वापर करून उच्चारले गेले. श्वान केवळ त्यांच्या मालकांची देहबोली, उपस्थितीच ओळखत नाहीत, तर ते शब्द समजण्यासाठी वेगवेगळ्या क्रिया करतात. याबाबत रोसानो म्हणाले. "आमचे निष्कर्ष महत्त्वाचे आहेत, कारण ते दर्शवतात की शब्द श्वानांसाठी महत्त्वाचे आहेत. ते केवळ संबंधित संकेतांनाच नव्हे, तर शब्दांना देखील प्रतिसाद देतात."

प्राण्यांच्या वर्तणाचा अभ्यास : अभ्यास अभ्यासाची कार्यपद्धती काटेकोरपणे पूर्व-नोंदणीकृत होती. ही पूर्व-नोंदणी सार्वजनिकरीत्या ऑनलाइन उपलब्ध आहे. कोणताही डेटा संकलित करण्यापूर्वी अभ्यासाच्या गृहीतकं, डेटा संकलन पद्धती, व्हेरिएबल्स आणि विश्लेषण योजनांची रूपरेषा दर्शवतं. रोसानो पुढे म्हणाले, “आम्ही या अभ्यासात फक्त पृष्ठभाग स्क्रॅच करत आहोत. बटण दाबण्याच्या अनुक्रमांमागील अर्थ आणि पद्धतशीरता यासह श्वान सक्रियपणे ही बटणे कशी वापरतात, हे भविष्यातील अभ्यास संशोधनातून समोर येणार. आमचं संशोधन त्यांच्या घरच्या वातावरणात प्राण्यांचा अभ्यास करण्याचं महत्त्व अधोरेखित करतं. त्यांच्या क्षमतांबद्दल अधिक पर्यावरणीयदृष्ट्या त्यांचा समज समजून घेण्याचा प्रयत्न करतंय.”

ABOUT THE AUTHOR

...view details