महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

आता ChatGPT व्हॉट्सॲपवरही चालणार, WhatsApp वर ChatGPT कसं वापरावं? - CHATGPT AVAILABLE ON WHATSAPP

ChatGPT available on WhatsApp : ChatGPT आता तुम्हाला WhatsApp देखील वापरता येणार आहे.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Tech Team

Published : Dec 19, 2024, 12:03 PM IST

हैदराबादChatGPT available on WhatsApp :OpenAI नं गुरुवारी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आणि कॅनडामधील त्यांच्या वापरकर्त्यांसाठी एक मोठी घोषणा केलीय. आता ChatGPT थेट WhatsAppसह लँडलाइन फोनवरही उपलब्ध झालंय. वापरकर्ते 1-800 डायल करून दरमहा 15 मिनिटांपर्यंत ChatGPT शी बोलू शकणार आहेत.

ChatGPT ला सबस्क्रिप्शनची आवश्यकता नाही : आता ChatGPT ॲक्सेस करणं पूर्वीपेक्षा खूप सोपं झालंय. फोन लाइनवर ChatGPT शी बोलण्यासाठी अतिरिक्त सबस्क्रिप्शनची आवश्यकता नसणार आहे. वापरकर्ते ChatGPT वर वैयक्तिक प्रश्न विचारू शकतात. ChatGPT WhatsApp वर देखील वापरता येणार आहे. WhatsApp वर ChatGPT कसं वापरायचं ते जाणून घेऊया..

वेबसाइट किंवा ॲप वापरण्याची गरज नाही :तुम्ही देखील ChatGPT वापरत असाल तर कंपनी तुमच्यासाठी एक मोठी घोषणा कलीय. होय, आता तुम्हाला ChatGPT वापरण्यासाठी वेबसाइट किंवा ॲप वापरण्याची गरज नाहीय. तुम्ही WhatsApp द्वारे मेसेज पाठवून ChatGPT देखील वापरू शकता. जगभरातील कोणीही ChatGPT वर फोन नंबर, 1-800-242-8478 वापरून संदेश पाठवू शकतो. X वर एक पोस्ट शेअर करत OpenAI नं ChatGPT कसं वापरायचं हे देखील सांगितलं आहे.

WhatsApp वर ChatGPT कसं वापरावं? :

  • आता व्हॉट्सॲपवर चॅटजीपीटी वापरण्यासाठी तुम्हाला प्रथम नंबर सेव्ह करावा लागेल. संपर्क वर जा आणि हा नंबर 1-800-242-8478 सेव्ह करा.
  • यानंतर, व्हाट्सएपच्या कॉन्टॅक्ट लिस्टवर जा आणि या चॅटजीपीटी नंबरवर हाय मेसेज करा.
  • आता तुम्ही येथून थेट WhatsApp वर ChatGPT वापरू शकता.
  • जसं तुम्ही ChatGPT ला प्रश्न विचारता, त्याचप्रमाणे तुम्ही आता WhatsApp वर चॅटबॉटशी बोलू शकता.

ChatGPT या कामांमध्ये मदत करेल :Meta चं मेसेजिंग ॲप WhatsApp चे दोन अब्ज मासिक सक्रिय वापरकर्ते आहेत. OpenAI नं सांगितलं की चॅटबॉटशी संवाद साधणारे वापरकर्ते कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारू शकतात. ChatGPT सर्जनशील लेखन, प्रकल्प नियोजन, शिफारशी, संभाषण यासारख्या कामांमध्ये मदत करू शकतं.

हे वचालंत का :

  1. Kawasaki Ninja 1100SX भारतात 13.49 लाखात लाँच, रायडिंगसाठी 6 गियर
  2. 2024 मध्ये ओला रोडस्टर, होंडा ॲक्टिव्हा ई, रॉयल एनफील्ड हंटर 350 दुचाकींनी गाजवलं वर्चस्व
  3. इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीत बंपर वाढ, 'ही' कंपनी आहे देशात नंबर वन

ABOUT THE AUTHOR

...view details