हैदराबाद : फ्लिपकार्टच्या सध्या सुरू असलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या सेलमध्ये iPhone 16 वर बंपर सूट मिळतेय. या सेलला (Flipkart Monumental Sale 2025) असंही म्हणतात. तुम्ही या सेलमध्ये iPhone 16 मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता. iPhone 16 चं 128GB मॉडेल सध्या Flipkart ॲप आणि वेबसाइटवर 67,999 रुपयांना उपलब्ध आहे. ही ऑफर Flipkart Plus आणि प्रीमियम सदस्यांसाठी उपलब्ध आहे. सदस्य नसलेल्यांसाठी, iPhone 16 सवलतीच्या 69,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. एवढंच नाही तर, बँक सवलतींसह, तुम्ही 64,499 रुपयांमध्ये iPhone 16 मिळवू शकता.
Apple iPhone 16Apple iPhone 16 खरेदीदारांना निवडक बँक ऑफर्ससह 3,500 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळू शकते, ज्यामुळं फोनची किंमत आणखी कमी होते. जर तुम्ही Flipkart Plus/प्रीमियम सदस्य असाल, तर तुम्ही iPhone 16 चं बेस मॉडेल 64,499 रुपयांना मिळवू शकता. त्याच वेळी, सदस्य नसलेल्यांना सेलमध्ये 66,499 रुपयांना फोन मिळू शकतो. ही ऑफर आता Flipkart वर उपलब्ध आहे.
Apple iPhone 16 ऑफर
वरील सवलतींव्यतिरिक्त, Flipkart iPhone 16 सह 16-मिनिटं आणि एक दिवसाची एक्सप्रेस डिलिव्हरी देतंय. मात्र, ही सेवा फक्त निवडक पिन कोडवर उपलब्ध आहे.
Apple iPhone 16 ची वैशिष्ट्ये
आयफोन 16 मध्ये 6.1-इंचाचा OLED डिस्प्ले आहे, जो 2556x1179 पिक्सेल रिझोल्यूशन आणि 460 ppi पिक्सेल ब्राइटनेस देतो. पाणी, स्प्लॅश आणि धूळपासून वाचण्यासाठी फोनला IP68 रेटिंग मिळलं आहे.
कॅमेरा
आयफोन 16 चं एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कॅमेरा कंट्रोल, जे व्हिज्युअल इंटेलिजेंसमध्ये जलद प्रवेश देते, ज्यामुळे वापरकर्त्यांना वस्तू आणि स्थानं जलद ओळखता येतात. हे फीचर फोटो काढण्यासाठी किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी जलद कॅमेरा प्रवेश सक्षम करतं. आगामी अपडेटमुळं या व्हिज्युअल इंटेलिजेंसची क्षमता आणखी वाढणार आहे. आयफोन 16 मध्ये 48MP फ्यूजन कॅमेरा आहे, ज्यामध्ये 2x टेलिफोटो लेन्स आणि 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. त्यात सेल्फीसाठी ƒ/1.9 अपर्चरसह 12MP ट्रूडेप्थ फ्रंट कॅमेरा देखील समाविष्ट आहे. फोन फोटो आणि व्हिडिओ कॅप्चरच्या समर्थनासह ऑडिओ मिक्स सारखी नवीन ऑडिओ एडिटिंग टूल्स वापरकर्त्यांना कॅप्चरनंतरचा आवाज समायोजित करण्यास, अनुमती देतं. या फोनमध्ये मशीन लर्निंगद्वारे वाऱ्याचा आवाज कमी केला जाऊ शकतो. त्यामुळं पाठीमागील आवाज कमी करता येतो. हे फीरच व्हिडीओग्राफीसाठी उत्तम पर्याय आहे.
प्रोसेसर
A18 बायोनिक चिपद्वारे समर्थित, आयफोन 16 ॲपल इंटेलिजेंस कार्यप्रदर्शन वाढविण्यासाठी दुसऱ्या आवृत्तीच्या 3-नॅनोमीटर तंत्रज्ञानाचा वापर करतं. त्याचे 16-कोर न्यूरल इंजिन मोठं जनरेटिव्ह मॉडेल चालविण्यासाठी ऑप्टिमाइझ केलेलं आहे, जे A16 चिपपेक्षा दुप्पट वेगानं मशीन लर्निंग कार्ये करतं. 16-कोर CPU 30% कामगिरी वाढवतं.
ॲपल इंटेलिजेंस
iOS 18 वर कार्यरत असलेला आयफोन 16 मध्ये ॲपल इंटेलिजेंस देखील मिळतं, जो मोफत सॉफ्टवेअर अपडेट म्हणून उपलब्ध असलेल्या प्रगत वैशिष्ट्यांचा संच आहे. ॲपल इंटेलिजेंस iOS 18 मध्ये लेखन साधनं मिळताय, ज्यामुळे वापरकर्त्यांना मेल, नोट्स, पेजेस आणि थर्ड-पार्टी प्लॅटफॉर्म सारख्या ॲप्समध्ये मजकूर पुन्हा लिहिणं, प्रूफरीड करणं शक्य होतं. नोट्स आणि फोन ॲप्समध्ये, वापरकर्ते ऑडिओ रेकॉर्ड, ट्रान्सक्राइब करू शकता.
हे वाचंलत का :
- REDMI Note 14 मालिका पाच प्रकारांमध्ये लाँच, स्पेसिफिकेशन्स आणि किंमतींचे संपूर्ण विश्लेषण
- Honda Elevate Vs Hyundai Creta च्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतींचं संपूर्ण विश्लेषण, कोणती कार आहे सर्वात बेस्ट?
- Poco X7 Pro 5G सेल थोड्याच वेळात होणार सुरू, सेलमध्ये मिळवा बंपर सूट