हैदराबाद Auto Expo 2025 :ऑटो एक्स्पो 2025 ची तारीख जाहीर झाली आहे. भारतातील सर्वात मोठा ऑटो एक्स्पो 17 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान आयोजित केला जाईल. या कार्यक्रमासाठी ऑटो प्रदर्शकांची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि हिरो मोटोकॉर्प सारख्या कंपन्या ऑटो एक्स्पो 2025 मध्ये सहभागी होत आहेत.
'या' कंपन्याचा सहभाग नाही : मात्र, जीप, रेनॉल्ट, निसान, रॉयल एनफील्ड आणि सिट्रोएन सारख्या कंपन्या या ऑटो एक्स्पोमध्ये सहभागी होणार नाहीत. या वर्षीचा ऑटो एक्स्पो खूपच चांगला असणार आहे, कारण भारतीय आणि आंतरराष्ट्रीय वाहन उत्पादकांकडून अनेक नवीन उत्पादनं सादर केली जाणार आहे. चला तर जाणून घेऊया, ऑटो एक्स्पो 2025 मध्ये कोणत्या कंपन्या सहभागी होणार आहेत.
ऑटो एक्स्पो 2025 मध्ये सहभागी होणाऱ्या कार कंपन्या :
- BMW इंडिया
- BYD
- Hyundai Motor India
- Kia India
- Mahindra & Mahindra
- Maruti Suzuki
- Mercedes-Benz
- MG Motor India
- Skoda Auto India
- Porsche
- Tata Motors
- Toyota Kirloskar Motor
जाहीर झालेल्या यादीनुसार, 2025 च्या इंडिया मोबिलिटी एक्स्पोमध्ये 13 कार उत्पादक सहभागी होतील. टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, ह्युंदाई, I आणि स्कोडा सारख्या कंपन्या सर्वात मोठी उत्पादनं सादर करतील अशी अपेक्षा आहे. अहवालांवर विश्वास ठेवला तर, टाटा मोटर्स या ऑटो एक्स्पोमध्ये बहुप्रतिक्षित हॅरियर EV तसंच सिएरा EV चं मॉडेल सादर करू शकते.