महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

Amazon Great Republic Day Sale 2025 मध्ये बंपर ऑफर, 'या' स्मार्टफोन्सवर भरघोस सूट - AMAZON GREAT REPUBLIC DAY SALE

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉननं त्याच्या वार्षिक ग्रेट रिपब्लिक डे सेलच्या तारखेची अधिकृतपणे घोषणा केलीय. Amazon चा रिपब्लिक डे सेल 13 जानेवारी 2025 ​​दुपारी सुरू होईल.

Amazon Great Republic Day Sale
Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल (Amazon)

By ETV Bharat Tech Team

Published : Jan 8, 2025, 2:54 PM IST

Updated : Jan 8, 2025, 4:07 PM IST

हैदराबाद :अमेझॉनचा वर्षातील पहिला सेल 13 जानेवारीपासून सुरू होत आहे. ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉननं प्रजासत्ताक दिनानिमित्त सेलच्या तारखा जाहीर केल्या आहेत. Amazon अधिकृतपणे त्यांच्या वार्षिक ग्रेट रिपब्लिक डे सेलच्या तारखेची घोषणा केलीय. Amazon चा रिपब्लिक डे सेल 13 जानेवारी 2025 रोजी दुपारी सुरू होईल. त्याच वेळी, Amazon प्राइम सदस्यांसाठी, हा सेल 13 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून सुरू होईल. सेलमधील स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, घरगुती उपकरणे, फॅशन आणि इतरांसह अनेक उत्पादनांवर 80% पर्यंत सूट उपलब्ध असेल. कोणत्या उत्पादनावर किती सवलत मिळेल चाला जाणून घेऊया...

Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल : बँक ऑफर
Amazon नं Amazon ग्रेट रिपब्लिक डे सेल 2025 साठी SBI कार्डसोबत भागीदारी केली आहे. जे वापरकर्ते SBI क्रेडिट कार्ड आणि EMI व्यवहारांवर उत्पादन खरेदी करतील त्यांना 10% पर्यंत त्वरित सवलतीचा लाभ मिळेल.

स्मार्टफोन्सवर सूट
ॲमेझॉनच्या मायक्रोसाइटनं स्मार्टफोन ऑफर्सची माहिती दिली आहे. iQOO Neo 9 Pro, iQOO Neo 12, आणि iQOO Z9 मालिका तसेच iQOO 13 सारख्या अनेक iQOO फोनवर मोठी सूट मिळणार आहे. OnePlus Nord 4, OnePlus Nord CE,4, आणि OnePlus Nord CE4 Lite यासह लोकप्रिय OnePlus मॉडेल्सवर सूट देण्यात आली आहे. Motorola Razr 50 Ultra, Tecno Phantom V Fold 5G, Vivo X200 Pro, आणि Samsung Galaxy S23 Ultra सारख्या उच्च श्रेणीतील स्मार्टफोनच्या किमतीत मोठी घट होण्याची अपेक्षा आहे.

ॲक्सेसरीज 40 टक्क्यांपर्यंत सूट
Amazon स्मार्टफोनवर 45,000 रुपये, लॅपटॉपवर 7,000 रुपये, स्मार्ट टीव्हीवर 5,500 रुपये आणि उपकरणांवर 15,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट देत आहे. ई-कॉमर्स कंपनीनं अद्याप विक्रीच्या किंमती उघड केल्या नाहीत, परंतु मायक्रोसाइटवर सवलतीची झलक पहायाला मिळतेय. इलेक्ट्रॉनिक्स आणि ॲक्सेसरीजवर एक टक्क्यापर्यंत सूट मिळणार आहे. स्मार्ट टीव्ही आणि प्रोजेक्टर 65 टक्क्यांपर्यंत आणि मोबाइल आणि ॲक्सेसरीज 40 टक्क्यांपर्यंत सूट मिळेल.

हे वचालंत का :

  1. डुकाटी यावर्षी तब्बल 14 मोटारसायकली भारतात करणार लॉंच
  2. Poco X7 आणि X7 Pro उद्याच होणार लॉंच, कुठं पाहणार लाइव्ह?, अपेक्षित किंमत, डिझाइन, वैशिष्ट्ये जाणून घ्या...
  3. डॉ. व्ही. नारायणन इस्रोचे नवीन प्रमुख, 14 जानेवारी रोजी सोमनाथ यांच्याकडून स्वीकारणार पदभार
Last Updated : Jan 8, 2025, 4:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details