हैदराबाद : आधार कार्ड धारकांसाठी महत्वाची माहिती आहे. UIDAI नं (Unique Identification Authority of India) आधार अपडेटसाठी कागदपत्रं अपलोड करण्याची अंतिम तारीख 14 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. आता नाव बदलण्यासाठी राजपत्र अनिवार्य आहे. घोटाळे रोखण्यासाठी UIDAI नं हे पाऊल उचललं आहे. जन्मतारीख दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला जवळच्या आधार केंद्रावर जावं लागणार आहे.
आधार कार्ड अपडेट :जर तुम्ही आधार कार्डधारक असाल आणि तुम्हाला तुमचं आधार कार्ड अपडेट करायचं असेल तर आम्ही तुम्हाला काही माहिती देणार आहोत. या माहितीच्या मदतीनं तुम्हाला काही गोष्टी जाणून घेणं सोपं होणार आहे. जर तुम्ही या गोष्टींचं पालन केलं तुम्हाला जास्त त्रास होणार नाहीय. आम्ही तुम्हाला UIDAI शी संबंधित माहिती देणार आहोत. UIDAI च्या अपडेटनुसार, कागदपत्रे अपलोड करण्याची अंतिम तारीख 14 डिसेंबरपर्यंत निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच तुम्ही यादरम्यान आधार कार्ड अपडेटशी संबंधित कागदपत्रं अपलोड करू शकता.
कोणती कागदपत्रे सादर केली जाऊ शकतात? :आयडी प्रूफ, ॲड्रेस प्रूफसह माहिती अपडेट करण्यासाठीची कागदपत्रे 14 डिसेंबरपर्यंत अपलोड करता येतील. तुम्हाला हे काम UIDAI नं दिलेल्या डेडलाइनमध्ये पूर्ण करावं लागेल. मात्र, याआधीही यूआयडीएआयनं मुदत वाढवून दिली आहे. तुम्हालाही आधार कार्ड अपडेट करायचं असेल, तर कागदपत्रे अपलोड करण्याची प्रक्रिया आजच पूर्ण करायला हवी.