हैदराबादHottest Year 2024 : 2024 मध्ये हवामान बदलामुळं जगभरात तपमानात 41 दिवसांनी वाढ झालीय. यावर एक नवीन संशोधन अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. वर्ल्ड वेदर ॲट्रिब्यूशनचे प्रमुख डॉ. फ्रेडरिक ओटो म्हणाले, की 2024 हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष होतं. या काळात 3 हजार 700 हून अधिक नागरिकांना आपले प्राण गमावावे लागलेय.
"जगभरातील लाखो लोकांना उष्णतेमुळं आणि संबंधित आजारांमुळं विस्थापित व्हावं लागलं. हवामान बदलामुळं पूर, वादळ आणि दुष्काळामुळं लोकांना समस्यांना तोंड द्यावं लागलं". - डॉ. फ्रेडरिक ओटो, प्रमुख वर्ल्ड वेदर ॲट्रिब्यूशन
2040 पर्यंत परिस्थिती गंभीर :यासोबतच ते म्हणाले की, जोपर्यंत जगात जीवाश्म इंधन जाळत राहील, तोपर्यंत हवामान बदलाची समस्या वाढत जाईल. संशोधनात असंही म्हटलं की जर दरवर्षी तापमान 2 अंश सेल्सिअसनं वाढत राहिलं तर 2040 पर्यंत परिस्थिती गंभीर होऊ शकते.
काय आहे संशोधन अहवालात ? :
- 29 पैकी 26 नैसर्गिक आपत्ती हवामान बदलाशी संबंधित होत्या.
- काही ठिकाणी हवामान बदलामुळं उष्णतेची लाट 150 किंवा त्याहून अधिक दिवस होती.
- हवामान बदलामुळं होणारे नुकसान रोखण्यासाठी तातडीनं उपाययोजना करणं आवश्यक आहे.
- जगभरात सुमारे 13 महिन्यांपासून उष्णतेच्या लाटा सुरू आहेत.
- नैसर्गिक आपत्तींमुळं हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.