हैदराबाद PM Jeevan Jyoti Bima Yojana :प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) ही सर्वसामान्य नागरिकांना परवडणारी विमा सरक्षण देणारी केंद्र सरकाची योजना आहे. या योजनेअंतर्गत, 18 ते 50 वर्षे वयोगटातील व्यक्तींना नाममात्र प्रीमियमवर विमा संरक्षण मिळू शकतं. ही योजना विशेषत: समाजातील अशा घटकांना लक्षात घेऊन सुरू करण्यात आली आहे, जे महागड्या विमा योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांचं विमा संरक्षण उपलब्ध आहे. आज आम्ही तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया कशी असते?, या योजनेसाठी अर्ज करसा करायचा?, योजनेचा लाभ घेण्यासाठी काय पात्रता असते?, इत्यादी बद्दल माहिती सांगणार आहोत.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता :
- वयोमर्यादा :18 ते 50 वयोगटातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो.
- बँक खाते : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचं बँकेत बचत खातं असणं अनिवार्य आहे.
- आरोग्य :योजनेत सहभागी होण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय तपासणीची आवश्यकता नाही, परंतु व्यक्तीनं आरोग्याविषयी कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती देऊ नये.
कशी आहे अर्ज प्रक्रिया :प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आणि जलद आहे. तुम्ही तुमच्या बँकेद्वारे अर्ज सहज करू शकता.
बँकेशी संपर्क साधा : या योजनेत सामील होण्यासाठी, प्रथम तुम्हाला तुमच्या बँकेशी संपर्क साधावा लागेल. बहुतेक सरकारी आणि खाजगी बँका या योजनेची अंमलबजावणी करतात. तुम्ही तुमच्या बँकेच्या शाखेला भेट देऊन अर्ज करू शकता, किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे देखील तुम्हाला अर्ज करता येईल.
अर्ज प्राप्त करा : तुम्हाला बँकेच्या शाखेतून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी अर्ज मिळेल. हा फॉर्म बँकेच्या काउंटरवर किंवा बँकेच्या अधिकृत वेबसाइटवरही उपलब्ध आहे.
फॉर्म भरा :अर्जामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागेल, जसं की नाव, जन्मतारीख, बँक खाते क्रमांक, आधार कार्ड तपशील इ. तसंच, ज्या नामनिर्देशित व्यक्तीला तुम्हाला विम्याच्या रकमेचा लाभार्थी बनवायचं आहे, त्याचं नावही त्यात टाकावं लागेल.