विद्यार्थ्यांनी कोडिंगचा वापर करून बनवले ॲप नागपूर Computer Science Hackathon Festive : दोन दिवसीय जिल्हास्तरीय 'कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन' उत्सवाचं नागपुरात आयोजन करण्यात आलं होतं. यात नागपूर जिल्हा परिषदेतील शाळेच्या विद्यार्थ्यांनी कोडिंगचा वापर करून भन्नाट ॲप, गेम आणि अॅनिमेशन तयार केलंय. या उत्सवात जिल्ह्यातील २ हजार ८८५ विद्यार्थ्यानी पहिल्या टप्प्यात नोंदणी करून सहभाग घेतला होता.
नागपूर जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी किती गुणी आणि प्रतिभावंत आहेत, याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या 'कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन' उत्सवात आलाय. नागपूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोडिंगचा वापर करून चक्क मोबाईल अॅप्लिकेशन, गेम आणि अॅनिमेशन तयार केलंय.
विद्यार्थ्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी उपक्रम :इयत्ता चौथी ते आठवीच्या वर्गात शिकणारे हे विद्यार्थी आहेत. त्यांच्या पंखांना बळ देण्यासाठी जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था तसेच शिक्षण विभाग जिल्हा परिषद नागपूर, अमेझॉन फ्युचर इंजिनिअर, लीडरशीप फॉर इक्विटी आणि कोड टू एनहान्स लर्निंग संस्थेच्या संयुक्त विद्यमानानं नागपूर येथे दोन दिवसीय जिल्हास्तरीय 'कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन उत्सव' साजरा करण्यात आला. त्यात जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी किमया केली आहे. हॅकेथॉन उत्सवात पहिला आणि दुसरा क्रमांक पटकावलेल्या शाळांची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय हॅकेथॉन उत्सवासाठी निवड करण्यात आलीय.
११ शाळांमधील ३३ विद्यार्थ्याची निवड : 'कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन' उत्सवामध्ये नागपूर जिल्हा परिषदे शाळेत शहरी भागात शिकणारे विद्यार्थी, ग्रामीण, आदिवासी भागातील विद्यार्थी तसेच महानगरपालिकेच्या शाळामधील अशा एकूण २८८५ विद्यार्थ्यानी पहिल्या टप्प्यात सहभाग घेतला होता. त्यापैकी १७३१ विद्यार्थ्यांनी अनप्लग (कम्प्युटरशिवाय) चॅलेंज सोडवलं होतं. अनप्लग चॅलेंजमधील अचूक मांडणी आणि उत्तमपणे कामगिरी विद्यार्थ्यांनी केली. या निकषा आधारे जिल्हास्तरावर ११ शाळांमधील ३३ विद्यार्थ्यांची 'कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन' उत्सवासाठी निवड करण्यात आली होती. निवड झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी स्क्रॅच प्लॅटफॉर्मवर कोडींग करत समस्यांवर उपाय शोधून कोडींगच्या सह्यायानं ॲनिमेशन आणि एप्लीकेशन स्वरूपात प्रोजेक्ट तयार केलंत.
'या' विषयावर विद्यार्थी करतायेत प्रोजेक्ट : कोडींगवर आधारित प्रोजेक्ट तयार करताना विद्यार्थी एकविसाव्या शतकातील कौशल्ये जसे की, चिकित्सक विचार (Critical thinking), सहकार्य (Collaboration), संवाद कौशल्ये (Communication), समस्या निवारण (Problem Solving) यांचा वापर केला. या उत्सवात त्यांना आजूबाजूच्या समस्येवर आधारित कोडींग करून प्रोजेक्ट बनवून मान्यवरांसमोर सादर केला. कचरा व्यवस्थापन, नॉईलान धागा आणि त्याचे पक्षांवर होणारे परिणाम, भ्रष्टाचार, शेतकरी प्रश्न, कॅन्सर आदी प्रकारच्या समस्या घेऊन तयार करत कोडिंगच्या साह्याने गेम, अनिमेशन, ॲप तयार करून सादर करण्यात आला होता.
या शाळांनी मारली बाजी :'कॉम्प्युटर सायन्स हॅकेथॉन' उत्सवामध्ये प्रथम पारितोषिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा थुगाव निपाणी, द्वितीय पारितोषिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुमगावं क्र.२ यांनी पटकावलाय. एकूण सर्व ११ शाळांना ही पारितोषिकं देण्यात आलीत. यात पहिल्या ५ शाळांना ४३ इंची LED टीव्ही भेट देण्यात आलाय, तर इतर ६ शाळांना टॅब आणि रोख बक्षिसे देण्यात आलीत. पहिला आणि दुसरा क्रमांक आलेल्या शाळांना पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय हॅकेथॉन उत्सवासाठी निवड करण्यात आली. या उत्सवामध्ये खूप उत्साहाने शिक्षकानी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रम यशस्वतेसाठी लीडरशिप फॉर इक्विटी आणि कोड टू एन्हांस लर्निग संस्थेच्या टीमने मेहनत घेतली.
हेही वाचा -
- चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या 72 शाळा अंधारात; जिवती तालुक्यातील 37 शाळांचा समावेश
- ZP Students Letter to CM : टपाल दिनानिमित्त शाळा वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे घातलं साकडं...
- ZP School: आता शाळांमध्ये शिक्षकांना मोबाईल बंदी, निर्णयाची कडक अंमलबजावणी सुरू