मुंबई :वांद्रे येथील निर्मल नगरमधील आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर बाबा सिद्दीकींवर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गँगनं घेतली असल्याची माहिती समोर येत आहे. या हत्या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत असून त्यांनी या हल्ल्यातील काही संशयित आरोपींना महाराष्ट्रासह वेगवेगळ्या भागातून अटक केली.
- झिशान सिद्दीकींचा इशारा :वडिलांच्या हत्येनंतर त्यांचे पुत्र व वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे आमदार झिशान सिद्दीकी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. या पोस्टद्वारे त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसंच वडिलांच्या मारेकऱ्यांना इशारादेखील दिला आहे.
काय आहे पोस्ट? : झिशान सिद्दीकी यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "त्यांनी माझ्या वडिलांना मारलं, पण ते (आरोपी) विसरतायत की ते (बाबा सिद्दीकी) सिंह होते. त्या सिंहाचा अंश माझ्यातही आहे. त्यांचा लढा माझ्याही रक्तात वाहतोय. ते नेहमी न्यायासाठी उभे राहिले. परिवर्तनासाठी लढले. या लढाईच्या काळात त्यांनी मोठ्या धैर्यानं वादळांचा सामना केला. ज्यांनी माझ्या वडिलांना मारलं त्यांनी असं समजू नये की ते जिंकलेत. त्यांना मला सांगायचं आहे की, त्या सिंहाचं रक्त माझ्या धमण्यांमधून वाहतंय. मी अजूनही इथेच आहे. निर्भय आणि ठामपणे उभा आहे. त्यांनी एकाला मारलं, पण त्यांच्या जागी आता मी उभा आहे. ही लढाई आता संपणार नाही. माझे वडील जिथं होते, तिथंच आज मी उभा आहे. ठाम, निश्चल आणि पूर्ण तयारीनिशी! माझ्या वांद्रे पूर्व मतदारसंघातील लोकांना मला सांगायचं आहे की मी सदैव त्यांच्याबरोबर आहे."
- आतापर्यंत दहा आरोपी अटकेत : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राज्यात खळबळ उडाली होती. तसंच या घटनेवरुन राजकारण न करण्याचं आवाहनही आमदार झिशान सिद्दीकी यांनी केलं होतं. या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेनं 20 ऑक्टोबरला आणखी एकाला अटक केली आहे. आतापर्यंत 10 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा
- भाजपाच्या 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; अशोक चव्हाणांच्या मुलीला तिकीट, वाचा संपूर्ण यादी
- भाजपाची पहिली यादी जाहीर; पुण्यातील 'या' मतदारसंघातील पेच अजूनही कायम
- हिंगणा मतदारसंघ भाजपासाठी सोयीचा; काँग्रेस, राष्ट्रवादीत रस्सीखेच