World Vada Pav Day 2024 :23 ऑगस्ट हा दिवस 'जागतिक वडापाव दिवस' म्हणून साजरा केला जातो. वडापाव हा पदार्थ मुंबईकरांसाठी जीव की प्राण आहे. वडापाव हे सर्वसामान्यांसाठी परवडणारं अन्न तसंच बेरोजगारांसाठी रोजगाराचं साधन आहे. मुंबईच्या रस्त्यांवर वडापाव खाण्यासाठी नेहमीच गर्दी असते. मुंबई आणि वडापाव हे समीकरण जगात भारी आहे. अनेक मुंबईकरांसाठी नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण म्हणजे फक्त वडापाव. मुंबईचा वडापाव जगभरात कसा काय प्रसिद्ध झाला? चला जाणून घेऊ.
मुंबईचा वडापाव (Source - ETV Bharat Reporter) वडापाव सर्वसामान्यांचा आवडता पदार्थ :वडापाव हा मुंबई सर्वत्र सहज उपलब्ध होणारा खाद्यपदार्थ आहे. वडापावची किंमत हा एक त्यातील महत्त्वाचा भाग आहे. मुंबईतील अनेक झोपडपट्ट्यांमध्ये अथवा कष्टकरी वर्गामध्ये वडापाव लोकप्रिय होण्याचं कारण म्हणजे वडापावची परवडणारी किंमत. अन्य कोणत्याही पदार्थांच्या तुलनेत वडापावची किंमत ही सर्वसामान्य ग्राहकांना परवडते. त्यामुळं मुंबईकर वडापाव या खाद्यपदार्थाला खूप महत्त्व देतात.
मुंबईतील प्रसिद्ध वडापावची ठिकाणं : मुंबईत अनेक ठिकाणी वडापाव विकला जातो. दादर येथील श्रीकृष्ण वडा, कीर्ती महाविद्यालयजवळचा वडापाव, काळाचौकी येथील वडापाव, भायखळा येथील ग्रॅज्युएट वडापाव, धन मिल नाका चौकातील वडापाव अशी काही वडापाव विक्रेत्यांची सुप्रसिद्ध ठिकाणं आहेत. "गेल्या अनेक वर्षापासून आपण या व्यवसायात आहोत आणि वडापाव वरील मुंबईकरांचं प्रेम कमी झालेलं नाही, उलट ते दिवसेंदिवस वाढत आहे." असं काळाचौकी येथील वडापाव विक्रेते धनंजय जाधव यांनी सांगितलं.
वडापाव हेच आमचं खाद्यप्रेम :या संदर्भात वडापाव विक्रेत्यांसमोर असलेली गर्दी आणि त्यांनी घेतलेला वडापावचा आस्वाद पाहता त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, "वडापाव हे आमचं पहिलं प्रेम आहे. एकवेळ आम्हाला जेवण मिळालं नाही तरी चालेल, पण आम्ही वडापाव खाणं टाळत नाही. वडापाव हा आपल्या खिशाला परवडणारा पदार्थ आहे," असं वडापाव प्रेमी संदीप शेटे यांनी सांगितलं.
हेही वाचा
- शाडूच्या गणेश मूर्तीसाठी बडगा; पण मातीच नाही, माती आणि पीओपी मूर्तींमधील फरक कसा ओळखायचा? - Ganeshotsav 2024
- प्रशिक्षण न घेता जोपासला कलेचा छंद : मालदाडमधील विद्यार्थ्यानं बनवल्या आकर्षक मूर्ती - Attractive sculpture
- नागपूर जिल्ह्यातील चांपा गावात नागरिकांनी सुरू केली 'प्लास्टिक बँक', उपक्रमाचं सर्वत्र होतंय कौतुक - Nagpur Plastic Bank