महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जागतिक हत्ती दिन 2024 विशेष: झारखंडच्या हत्तीचं 'हे' वैशिष्ट्य ठरतंय खास, पलामू व्याघ्र प्रकल्पात आहेत 180 हून अधिक हत्ती - World Elephant Day 2024 - WORLD ELEPHANT DAY 2024

World Elephant Day 2024 : 12 ऑगस्ट रोजी जागतिक हत्ती दिन आहे. झारखंडचे हत्ती भारतातील इतर राज्यात आढळणाऱ्या हत्तींपेक्षा बरेच वेगळे आणि खास आहेत. पश्चिम बंगाल, ओडिशा आणि कर्नाटकातील हत्तींपेक्षा येथील हत्ती कमी हिंसक आहेत. झारखंडमध्येही पलामू व्याघ्र प्रकल्पात आढळणारे हत्ती सर्वांत कमी हिंसक आहेत.

World Elephant Day 2024
झारखंडचे हत्ती (ETB Bharat) (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 11, 2024, 8:21 PM IST

पलामू (झारखंड)World Elephant Day 2024: जगात सर्वाधिक आशियाई हत्ती भारतात आहेत. सध्या देशातील हत्तींची संख्या 30,000 च्या आसपास आहे. हे हत्ती दक्षिण भारतातील केरळपासून पूर्व भारतातील आसामपर्यंत विस्तारलेल्या या एलिफंट कॉरिडॉरमध्ये राहतात. झारखंडमध्ये राहणारे हत्ती भारतातील इतर राज्यात आढळणाऱ्या हत्तींच्या तुलनेत खूपच वेगळे आणि खास आहेत.

झारखंडच्या हत्तींचं वैशिष्ट्य सांगताना पलामू व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक (ETV Bharat Reporter)

झारखंडचे हत्ती इतर राज्यांपेक्षा कमी हिंसक आहेत : सिंहभूमच्या क्षेत्राला एलिफंट रिझर्व्ह क्षेत्र म्हणतात. पलामू व्याघ्र प्रकल्प परिसरातही मोठ्या संख्येनं हत्ती राहतात. झारखंडचे हत्ती पश्चिम बंगाल, ओडिशा आणि कर्नाटकातील हत्तींपेक्षा कमी हिंसक आहेत. झारखंडमध्येही पलामू व्याघ्र प्रकल्पात आढळणारे हत्ती सर्वांत कमी हिंसक आहेत. याचे एक कारण म्हणजे, झारखंडमधील पलामू क्षेत्र वगळता उर्वरित भागात मयूरभंजी हत्ती आहेत. पलामू व्याघ्र प्रकल्पात 180 हून अधिक हत्ती आहेत. पलामू व्याघ्र प्रकल्पात सापडलेल्या हत्तीचे जनुकशास्त्र काय आहे? यावर सध्या संशोधन सुरू आहे.

दररोज दोन लोकांचा मृत्यू :देशात हत्ती आणि मानव यांच्यातील संघर्षामुळे दरवर्षी शेकडो लोकांचा मृत्यू होतो. एका सर्वेक्षणानुसार, भारतात हत्तींसोबत झालेल्या संघर्षामुळे दररोज सरासरी दोन लोकांचा मृत्यू होतो. 2023 मध्ये झारखंडमध्ये हत्तींमुळे 96 लोकांचा मृत्यू झाला. तर संपूर्ण भारतात 628 लोकांचा मृत्यू झाला. झारखंड आणि देशातील इतर राज्यांमध्ये संघर्ष आणि हत्तींमुळे होणारे मृत्यू यात खूप फरक आहे. यामागचं कारण म्हणजे येथील हत्ती इतर राज्यांपेक्षा खूपच वेगळे आहेत. ईटीव्ही भारतनं झारखंडमधील हत्तींची स्थिती आणि इतर बाबींबाबत पलामू व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक प्रजेशकांत जेना यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी येथील हत्तींच्या वैशिष्ट्यांचीही माहिती दिली.

झारखंडच्या हत्तींमध्ये आढळते 'हे' वैशिष्ट्य : पीटीआरचे उपसंचालक प्रजेशकांत जेना म्हणतात की, " झारखंडचे हत्ती इतर भागातील हत्तींपेक्षा कमी हिंसक आहेत. यामागचे प्रमुख कारण म्हणजे येथील हत्तींचा अनुवांशिक फरक आहे. सिंहभूम एलिफंट कॉरिडॉर आणि झारखंडमधील राखीव क्षेत्र झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल यांना जोडलेले आहे. हा केरळ आणि आसाममधील एक महत्त्वाचा दुवा आहे."

पलामू परिसरात हत्ती सोडले होते :पुढे उपसंचालक यांनी म्हटले," सुरगुजाच्या महाराजांनी पलामू परिसरात मोठ्या प्रमाणात हत्ती सोडल्याचा इतिहासात उल्लेख आहे. वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये पलामू क्षेत्रातील हत्तींवर संशोधन सुरू आहे. पलामू प्रदेशातील हत्तींची आनुवंशिकता शोधण्याचा प्रयत्न करत आहे. पलामू प्रदेशातील हत्तींची स्वतःची खास ओळख आहे. एक तर, ते क्वचितच हिंसक असतात. त्याच वेळी त्यांना एक हस्तिदंत असतो. या परिसरात हस्तिदंत नसलेले हत्तीही मोठ्या प्रमाणात आहेत."

विद्युत कुंपण बसवण्याची तयारी : हत्ती कॉरिडॉरवर अनेक संशोधनं सुरू आहे. जेणेकरून मानवांशी होणारा संघर्ष कमी करता येईल. उपसंचालक यांनी म्हटले, "हत्ती कॉरिडॉरवर विद्युत कुंपण घालण्याची तयारी सुरू आहे. या विद्युत कुंपणामुळे फारच कमी परिणाम होईल. याशिवाय ग्रामीण भागात काटेरी झाडे लावून हत्तींमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे."

हेही वाचा :

  1. मेळघाटात कोलकास हत्ती सफारी; कोलकासला पर्यटकांची पसंती, इंदिरा गांधींनाही घातली होती भुरळ
  2. Human Animal Conflict : टस्कर हत्तींनी अचानक थांबविली पिकांची नासधूस, निसर्गप्रेमीच्या 'त्या' सल्ल्यानं थांबला मानव-हत्ती संघर्ष
  3. Bijuli Prasad : राजेशाही थाट असलेल्या जगातील सर्वात वयोवृद्ध आशियाई हत्तीचे निधन, 90 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ABOUT THE AUTHOR

...view details