महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमित शाह यांच्या वक्तव्याविरोधात आंबेडकर प्रेमींचा निषेध मोर्चा - PROTEST AGAINST AMIT SHAH

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात मनमाड येथे निषेध मोर्चा काढण्यात आला.

Protest Against Amit Shah
आंबेडकर प्रेमींचा भव्य निषेध मोर्चा (ETv Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : 17 hours ago

मनमाड : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्याबद्दल संसदेत अपशब्द वापरून अपमान केला होता. या घटनेचा भारतभर तीव्र निषेध केला जात आहे. आज मनमाड येथे देखील संविधान आणि आंबेडकरप्रेमींच्या वतीनं भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह येथून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. शहरातील बस स्थानक, पाकिजा कॉर्नर, नगर परिषद, एकात्मता चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा फुले चौक, दादासाहेब गायकवाड चौक, रेल्वे स्टेशन मार्गे हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ थांबला.

आंबेडकरप्रेमींच्या वतीनं काढण्यात आला निषेध मोर्चा : अमित शाह यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात आंबेडकर प्रेमींच्या वतीनं शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा शहरातील विविध मार्गावरून काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ या मोर्चाचं सभेत रुपांतर करण्यात आलं. यावेळी अनेक मान्यवरांनी अमित शाह यांच्या या कृत्याचा निषेध केला. अमित शाह यांनी लेखी माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसंच जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आलं.

आंबेडकर प्रेमींचा भव्य निषेध मोर्चा (ETv Bharat Reporter)

मोर्चात ज्येष्ठ महिलांचा बाबासाहेबांचा फोटो घेऊन सहभाग :आज काढण्यात आलेल्या मोर्चात शहरातील सर्व राजकीय पक्ष कामगार संघटना, सामाजिक संघटना, कामगार, तरुण, ज्येष्ठ नागरिक, कॉलेज तरुण तरुणी यांच्यासह महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी या मोर्चात ज्येष्ठ महिलांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो घेऊन सहभाग घेतला होता.

हेही वाचा -

  1. अमित शाह यांच्या वक्तव्याचे पडसाद; विधानभवन परिसरात 'मविआ' अन् 'महायुती'चं आंदोलन, पाहा व्हिडिओ
  2. महाराष्ट्रात गोध्रासारखा प्रकार, प्रकाश आंबेडकर यांची टीका; सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरीची मागणी
  3. बीडचं प्रकरण सत्ताधारी पक्षाच्या नेत्याशी निगडीत असल्यानं दाबलं जाणार का? बाळासाहेब थोरात यांचा सवाल

ABOUT THE AUTHOR

...view details