महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

घरात घुसून हातपाय बांधून विवाहितेवर बलात्कार, मिरा-भाईंदरमधील धक्कादायक घटना, आरोपीच्या मुसक्या आवळल्या - Mira Bhayandar Rape Case - MIRA BHAYANDAR RAPE CASE

Mira Bhayandar Rape Case : देशात बलात्कार आणि हत्येविरोधात अनेक ठिकाणी निदर्शने होत आहेत. मात्र, त्यानंतरही महिलांवरील अत्याचार थांबत नाहीत. आता मिरा भाईंदरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात घुसून विवाहित महिलेचे हातपाय बांधून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. शनिवारी (१४ सप्टेंबर) रोजी भाईंदर पश्चिमेच्या परिसरात रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली.

Mira Bhayandar Rape Case
महिलेवर बलात्कार (ETV BHARAT Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2024, 10:46 PM IST

मिरा भाईंदर Mira Bhayandar Rape Case :घरात एकटी असल्याचं पाहून एका नराधमानं हातपाय आणि तोंड दुपट्यानी बांधून जबरदस्ती बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाईंदर पोलीस ठाणे हद्दीतील पश्चिम परिसरात ही घटना घडली आहे. यामुळं परिसरात एकच खळबळ माजली आहे. स्थानिकांच्या मदतीने या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

हातपाय बांधून केला बलात्कार :महिलेला घरात एकटी पाहून आरोपी गौतम किणीने घरात घुसून तिचे हातपाय आणि तोंड दुपट्ट्याने बांधून बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने घरातच दरवाजा बंद करून महिलेसमोर मध्यपान केलं. त्यानंतर पुन्हा त्यानं तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने हातपाय, तोंड बांधल्यानं महिलेला घराबाहेर येता आलं नाही. परंतु, शौचालयात जाण्याचा बहाना करत ती कशीबशी बाहेर आली. त्यानंतर शेजारी राहणाऱ्या घरमालकाला माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेजारी राहणारे घरमालक देखील घरात नव्हते. त्यानंतर महिलेने परिसरात आरडाओरड केली, हे पाहताच आरोपीने तिथून पळ काढला. या घटनेच्यावेळी महिलेची तीन वर्षाची लहान मुलगी घरात झोपलेली होती, सुदैवाने या घटनेत ती बचावली.

महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर : दिवसेंदिवस महिला अत्याचाराच्या वाढत्या घटनेमुळं महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार स्थानिकांनी या नराधम आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. १५ सप्टेंबर रोजी आरोपी गौतम किनी पुन्हा याच परिसरात फिरत असल्याचा स्थानिकांच्या निदर्शनास आलं. पीडित महिलेने ओळख पटवून दिल्यानंतर स्थानिकांनी आरोपीला ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं. भाईंदर पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून बलात्कार आणि इतर कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपी विरोधात चोरी, विनयभंग सारख्या चार पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती, भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक सोनवणे यांनी दिली.

हेही वाचा -

  1. धारावीत चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक - Minor girl raped
  2. इन्स्टाग्रामवरची मैत्री पडली महागात; तरुणीचे नग्न फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी - Beed Rape Case
  3. धक्कादायक! विवाहितेवर सामूहिक बलात्कार करून कोयत्यानं वार; सासरा, दीर अन् मामेभावाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Thane Gang Rape Case

ABOUT THE AUTHOR

...view details