मिरा-भाईंदर Woman Cheated Investment Scam : मिरा-भाईंदरमधील बड्या खासगी शिक्षण संस्थेमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा देण्याच्या नावाखाली एका महिला व्यापाऱ्याची 40 लाखांची फसवणूक करण्यात आली. संबंधित संस्थेच्या अध्यक्षाचा नातेवाईक असल्याचं सांगून ही फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा (Mira Bhayandar Crime) दाखल करण्यात आलाय.
काय आहे नेमकं प्रकरण? : मिरारोडच्या विजय पार्क परिसरात राहणाऱ्या शबाना हुसेन यांचा कपड्याचा व्यापार आहे. त्यांची काही वर्षांपूर्वी परदेशात व्यापार करत असताना जितेंद्र कुमार तिवारी नामक व्यक्तीशी ओळख झाली. यावेळी तिवारीनं तो 'राहुल कॉलेज शिक्षण संस्थे'चे अध्यक्ष लल्लन तिवारी यांचा नातेवाई असल्याचं सांगितलं. एके दिवशी लल्लन तिवारी यांच्या नातवाच्या लग्नातून व्हिडिओ कॉल हुसेन यांना विश्वास बसावा यासाठी केला होता.
40 लाखांचा घातला गंडा : शिक्षण संस्थेत 40 लाख रुपये गुंतवणूक केल्यास आठवड्याभरात 5 लाख नफा अधिक मूळ रक्कम असे 45 लाख परत करू, असं जितेंद्र तिवारी यानं त्या महिलेला सांगितलं. त्यावर विश्वास ठेवून शबाना यांनी तिवारीला पैसे दिले. हे पैसे परत करण्यास मात्र टाळाटाळ केली जात होती. त्यानंतर यात आपली फसवणूक झाल्याचं निदर्शनास येताच शबाना यांनी तक्रार दाखल केली होती. त्यावरून काशिमिरा पोलिसांनी जितेंद्र तिवारीवर गुन्हा दाखल केला असून, त्याचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा
- 9 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणारा नराधम 'स्केच'च्या आधारे जेरबंद - Minor Girl Sexual Abuse
- इंजेक्शन देऊन बेशुद्ध अवस्थेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार; 2 वर्षानंतर आरोपीला अटक - Minor Girl Sexual Abuse
- मुंबईकरांसाठी गुडन्यूज! आता वेगानं होणार पाणी पुरवठा, ठाणे-मुलुंड जल बोगद्याचे कार्यादेश जारी - Mumbai Water Supply